

Cockroach Found at Mumbai Five Star Hotel
Esakal
मुंबईतील प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलजवळ झुरळ फिरत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फोर्टिस रुग्णालयातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर अशोक सेठ यांनी हा व्हिडीओ शेअर करत प्रश्न उपस्थित केलेत. फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे पुन्हा एकदा स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. डॉक्टर सेठ यांनी व्हिडीओ शेअर करताना पोस्टमध्ये एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनाही टॅग केलंय. या प्रकरणी आता काय कारवाई होते याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.