"With the entry of these individuals, the number of corona has increased rapidly 
अहिल्यानगर

राहुरी, कर्जत, श्रीरामपूर, नेवासे...चार तालुक्यात चार पाॅझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

नगर ः बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींमुळे कोरोना बाधितांची संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातील आज (रविवार) चार जणांना कोरोनाचा संसर्ग आढळल्याचे स्पष्ट झाले. यात मुंबई, उल्हासनगर, तुर्भे, औरंगाबाद ठिकाणाहून आलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. 

आज सकाळी जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये 19 व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात या व्यक्ती बाधीत आढळून आल्या. यातील एक 26 वर्षीय व्यक्ती रविवारी (ता. 17) मुंबईहून राहुरी तालुक्‍यातील वांबोरी, दुसरी 60 वर्षीय बाधीतव्यक्ती मुंबई (तुर्भे) येथून शुक्रवारी (ता.22) कर्जत तालुक्‍यातील सिद्धटेक, तिसरी 32 वर्षीय बाधीत व्यक्ती औरंगाबाद येथून बुधवारी (ता. 20) श्रीरामपूर तालुक्‍यातील वडाळा महादेव, तर चौथी व्यक्ती उल्हासनगर येथून शुक्रवारी (ता. 22) नेवासे येथे आलेल्या 60 वर्षीय महिलाही बाधीत आढळून आली आहे. 

दरम्यान काही दिवसापूर्वी बाधीत आढळलेल्या घाटकोपर येथील महिलेचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील बाधीत रुग्णांचा आकडा 83 वर पोचला आहे. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. उर्वरित 14 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

निमोण येथील एकाचा मृत्यू 
नाशिक येथे उपचार घेत असलेल्या संगमनेर तालुक्‍यातील निमोण येथील एका रुग्णाचा शनिवारी (ता. 23) रात्री मृत्यू झाला. नाशिक येथे कार्यरत असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलचे ते वडील आहेत. त्यामुळे जिल्ह्यात मृत्यू पावलेल्यांची संख्या आता नऊ झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT