air
air sakal
अहमदनगर

Environment News : कोट्यवधींच्या खर्चानंतरही मिळेना शुद्ध हवा !

शेखलाल शेख -सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर -वायू प्रदूषण ही मोठी समस्या असल्याने राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम (एनसीएपी) राबविला जात आहे. शुद्ध हवेसाठी देशात मागील पाच वर्षांत विविध राज्यांना नऊ हजार ३१९ कोटी दिले असून त्यात महाराष्ट्राला चार वर्षांत देशात सर्वाधिक एक हजार ६८४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तरीही वायू प्रदूषणाची समस्या कायम आहे. पार्टिक्युलेट मॅटर १० ची वार्षिक सरासरी जास्त असलेल्यांत महाराष्ट्रातील १९ शहरांचा समावेश आहे. राज्यात वसई-विरार, बदलापूर, उल्हासनगर, चंद्रपूर, ग्रेटर मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर यांचे ‘पीएम १०’ वार्षिक सरासरीपेक्षा दुप्पटच्या जवळपास आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

देशात २०१७ मध्ये राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम सुरू करण्यात आला. देशात दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या १३१ शहरांत ‘पीएम १०’ची मात्रा अधिक आहे. यात महाराष्ट्रातील १९ शहरे आहेत. २०२४ पर्यंत ‘पीएम २.५’ आणि ‘पीएम १०’ दोन्हींचे प्रमाण २० ते ३० टक्क्यांनी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

पाच वर्षांत नऊ हजार ३१९ कोटी सर्व राज्यांना देण्यात आले. यात मागील चार वर्षांत महाराष्ट्राला एक हजार ६८४ कोटी मंजूर करण्यात आले. त्यांपैकी २०१९-२० मध्ये ३९.८५ कोटी, २०२०-२१ मध्ये ८०४.४० कोटी, २०२१-२२ मध्ये ४५३.२४ कोटी, २०२२-२३ या वर्षात ३८६.८३ कोटी असा निधी मिळाला.

पार्टिक्युलेट मॅटर म्हणजे काय?

हवेमध्ये विविध आकाराचे प्रदूषक घटक (घन आणि द्रव सूक्ष्म कण) असतात. अनेकदा धूळ, परागकण, काजळी आणि धूर यांचे मिश्रण होते. पार्टिक्युलेट मॅटर शरीरासाठी धोकादायक असून ते श्‍वसनावाटे शरीरात जाते. हे घटक जितके लहान असतील तेवढे ते अधिक धोकादायक ठरतात. हे सूक्ष्म कण हवेमध्ये बराच काळ टिकून राहतात आणि लांबवर पसरतात.

इतकेच नाही, तर शरीराच्या सर्वांत अरुंद वायुमार्गावरदेखील आक्रमण करून आजारांना कारणीभूत ठरतात. श्‍वसनमार्गातून थेट फुप्फुसापर्यंतदेखील पोचू शकतात. यामध्ये प्रामुख्याने ‘पीएम १०’ आणि ‘पीएम २.५’ याबाबत सर्वसाधारणपणे सर्वत्र अधिक चर्चा होते. पार्टिक्युलेट मॅटरच्या व्यासावरून त्यांची ओळख दर्शविली जाते. धूर, रस्त्यावरील धूळ, बांधकाम, जमीन भराव, शेती, वाहने, कारखाने हे पार्टिक्युलेट मॅटरचे स्रोत आहेत. तर काही क्लिष्ट रासायनिक अभिक्रियांमुळे होणाऱ्या उप-उत्पादनामुळेदेखील ‘पीएम २.५’ वातावरण सोडला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: लोकसभा निवडणुकीत मोदींना 270 पेक्षा कमी जागा मिळाल्यास शेअर बाजार कोसळणार? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Viral video: काय सांगता! आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची जीप थेट हॉस्पिटलमध्ये; काय होता त्याचा गुन्हा?

Bigg Boss OTT 3: मराठीनंतर हिंदी बिग बॉसमध्येही होणार मोठा बदल? सलमानच्या जागी 'हा' अभिनेता करणार सूत्रसंचालन?

Latest Marathi News Update: सीएनजी गॅस गळतीमुळे कराड मलकापूर मार्गावर वाहतूक खोळंबली

Virat Kohli : 'क्षणभर असे वाटत होते की...' RCBच्या पराभवानंतर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT