Even on December 31, there is no crowd of devotees in Shirdi
Even on December 31, there is no crowd of devotees in Shirdi 
अहमदनगर

नवर्षाच्या पूर्वसंध्येला साईंची शिर्डी सुनीसुनीच

सतीश वैजापूरकर

शिर्डी ः राज्यातील पर्यटनस्थळे गर्दीने ओसंडून वाहत आहेत. दुसरीकडे देशातील सर्वाधिक गर्दीचे धार्मिक पर्यटनकेंद्र असणाऱ्या शिर्डीत आज शुकशूकाट होता. दर्शन जेवढे सुलभ, तेवढी अधिक गर्दी. जेवढी बंधने, तेवढी गर्दी कमी, नाशिक कुंभमेळ्याच्या वेळी आलेल्या या अनुभवाच्या प्रत्यय आज पुन्हा आला. 

31 डिसेंबर शिर्डीतील सर्वाधिक गर्दीचा दिवस. हॉटेल, लॉजेसवर दोन दिवस आधीच झळकणारे हाऊसफुलचे बोर्ड, शहरापासून 25 किलोमीटरवरील धर्मशाळेत जागा मिळविण्यासाठी फिरणारे भाविक आणि अर्थकारणाला लाभणारा तेजीची तडका, हे चित्र यंदा नाताळ व सलग सरकारी सुट्यांच्या काळातही दिसले नाही. अन्यत्र पर्यटकांची तोबा गर्दी असताना, शिर्डीत शुकशूकाट होता. 

हे असे का झाले, याचे उत्तर जाणकारांनी शोधण्याची वेळ आली आहे. साईसमाधीचे दर्शन झाले की भाविक परतीचा मार्ग धरतात. कारण, येथे मुक्कामासारखे वातावरण नाही.

करमणुकीची साधने नाहीत. कोविडमुळे दर्शनपास घेण्यासाठी रांग, दर्शनबारीसाठी रांग, ऑनलाइन पास, ऑफलाइन पास, तर कधी सर्व्हर डाऊन. अशी अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर मिळते साईदर्शन. कोविडच्या प्रकोप तर सर्वत्र असतानाही तेथील पर्यटनस्थळे गर्दीने ओसंडून वाहत आहेत. 

नाशिक कुंभमेळ्याच्या वेळी बाबांच्या झोळीतील निधी पाण्यासारखा खर्च करून वाहनतळे बांधली. सरकारी विभागांसाठी संस्थानच्या खर्चाने लाखोंचे साहित्य दिले. प्रत्यक्षात गर्दी झालीच नाही. कारण, नाशिक आणि शिर्डीत त्यावेळी बंधने लादली होती.

साईसंस्थानच्या अर्थकारणाचा विचार केला, तर कामगारांच्या दरमहा वेतनाचा खर्च 18 कोटी रुपये आहे. सध्या हुंडीतील उत्पन्न दरमहा केवळ 15 कोटी रुपये आहे. हॉटेल व्यवसाय कर्जात बुडाला आहे. येथील आर्थिक अरिष्ट फार गंभीर आहे. 

उद्योजक म्हणतात.. 
दरवर्षी आमचे रिसोर्ट दोन-तीन दिवस आधीच हाऊसफुल होतात. मात्र, काल एकही भाविक मुक्कामी नव्हता, असा अनुभव पहिल्यांदाच आला. 
- किशोर बोरावके, बाबांच्या काळातील शिर्डी प्रकल्पाचे प्रमुख 

भाविकांना येथे चार-दोन दिवस मुक्काम करावा, असे वातावरण व सुविधा होत नाही, तोपर्यंत अर्थकारणाला चालना मिळणे अवघड वाटते. आमच्या स्वामी रिसोर्टवर काल शुकशूकाट होता. 
- राजेंद्र कोते, हॉटेल उद्योजक 

शिर्डीतील जाणत्या मंडळींनी एकत्र येऊन, या समस्येतून मार्ग काढण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत. 
- राजेंद्र गोंदकर, उद्योजक 

साईमंदिर दर्शनासाठी पुन्हा खुले झाल्यापासून परिस्थिती जैसे-थे आहे. छोटे-मोठे व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. भविष्याची चिंता सर्वांना सतावते आहे. 
- धनंजय शेळके, हॉटेल उद्योजक 

तिरूपती येथे रोज सुमारे 35 हजार भाविक दर्शन घेतात. पूर्वी तेथे रोजचे तीन कोटींचे उत्पन्न मिळायचे. सध्या रोज दोन कोटी रुपये उत्पन्न मिळते. पुढील दोन महिन्यांत तेथील परिस्थिती पूर्ववत होईल. शिर्डीतील हॉटेल व्यवसायासमोरील अडचणी कशा दूर होणार? 
- नीलेश जपे, हॉटेल उद्योजक 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Alyad Palyad: ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार सिद्धयोगी साधूची भूमिका; लूकनं वेधलं लक्ष

ICICI Bank: NRI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; UPI संदर्भात नवीन घोषणा, जाणून घ्या प्रक्रिया

Latest Marathi News Update: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना दोन महिन्यांसाठी अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT