Every year on the occasion of the birth anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj Jamkhedkar is given a feast of breakfast and lunch.jpg
Every year on the occasion of the birth anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj Jamkhedkar is given a feast of breakfast and lunch.jpg 
अहमदनगर

टेकाळे कुटूंबाचा अभिनव उपक्रम; शिवजयंती निमित्ताने 'शिपी आमटी' चा महाप्रसाद

वसंत सानप

जामखेड (अहमदनगर) : देशसेवेसाठी योगदान असलेल्या 'टेकाळे' कुटुंबाचा गेली चार वर्षांपासून अभिनव उपक्रम सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी जामखेडकरांना नाश्ता व जेवणाची मेजवानी दिली जाते. मात्र यावर्षी 'शिपी आमटी' चा महाप्रसाद दिला, जामखेडकरांनी ही त्याचा मनमुराद आनंद घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम घेतले जातात. जामखेडलाही कार्यक्रम होतात. मात्र दिपक टेकाळे, भाऊ तनपुरे, अमोल फंदाडे या मित्रांनी सुरु केलेल्या 'स्नँक्स वर्ल्ड' या हाँटेलच्या माध्यमातून गेली चार वर्षांपासून 'एक दिवस माझ्या राजासाठी' या उक्ती प्रमाणे शिवभक्तांना  नाश्ता आणि जेवण दिवसभरासाठी 'मोफत' दिले जाते. यावर्षी तर चक्क शिपी आमटीचा बेत होता. लहान थोरांनी या आनंदोत्सवात सहभाग नोंदविला. दिवसभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्याने परिसर दणदणून गेला होता.

शुक्रवार (ता.19) फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सवानिमित्ताने सकाळी शिववंदन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांची विधीवत पुजा होऊन 'स्नँक्स वर्ल्ड' येथे शिवभक्तांना दिवसभर यथोचित शिपी आमटीचा स्वाद घेता येईल, असे दिपक टेकाळे यांनी सांगितले. या सुरु असलेल्या उपक्रमाविषयी बोलताना दीपक म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले. सर्वांना मान सन्मानाने जगण्याची शिकवण आणि हिंमत दिली, असा राजा यापुढे होणार नाही. त्यांच्या प्रती असलेला आदर व्यक्त करण्यासाठी जन्मदिन केवळ समाजासाठी वाहून घेण्याचा संकल्प आम्ही सर्व सहकार्यांनी ठरविला आणि गेली पाच वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. तो अविरत सुरु ठेवणार आहेत. 

वर्षातील एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या भक्तासाठी असे ठरवून हे सुरू आहे. सकाळी अकरा वाजता शिपी आमटी सुरु होईल ती दिवसभर सुरु राहील. याकरिता बीड रोड, जामखेड येथे स्नँक्स वर्ल्डला व्यवस्था केलेली होती. या उपक्रमासाठी गणेश खैरे, प्रविण खैरे, बाळासाहेब मुळे, स्वप्नील कस्तुरे, अशोक खाडे, काशीनाथ ओमासे, शशीकांत राऊत यांचे विशेष सहकार्य मिळाले.

टेकाळे कुटुंबाची दुसरी पिढी दैशसेवेत !

टेकाळे कुटुंबाला देशसेवेचा इतिहास आहे. दिपक हे सैन्यात होते. मात्र त्यांना स्वइच्छा निवृत्ती घेतली. त्यांचे वडील स्वर्गीय अर्जूनराव टेकाळे ऊर्फ नाना यांनी आपली उभी हयात सैन्यात घातली. त्यांचा मोठे बंधू प्रमोद आजही देशसेवेसाठी सीमेवर तैनात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT