MPSC Exam
MPSC Exam Sakal
अहमदनगर

अहमदनगर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची रविवारी परीक्षा

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एम.पी.एस.सी.) वतीने घेण्यात येणारी राज्य सेवा (पूर्व) परीक्षा रविवार (ता.२३) जिल्ह्यातील ३४ उपकेंद्रांवर होणार आहे. जिल्ह्यातील १२ हजार ४५६ उमेदवार परीक्षेस बसले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिली.

अहमदनगर शहरातील शाळा, महाविदयालय या ३४ उपकेंद्रावर उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी दहा ते दुपारी १२ व दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहे. या परीक्षेसाठी उपजिल्हाधिकारी संवर्गातील समन्वय अधिकारी - नऊ, भरारी पथक प्रमुख-दोन, वर्ग-एक संवर्गातील उपकेंद्र प्रमुख- ३४ अधिकारी तसेच पर्यवेक्षक, सहायक, मदतनीस असे विविध वर्ग- तीन संवर्गातील एक हजार १३० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना परीक्षाकेंद्रावर सकाळी साडे आठ वाजता प्रवेश देण्यात येणार आहे. परीक्षेच्या दोन सत्राच्या मधल्या वेळेमध्ये उमेदवारांना परीक्षा केंद्राबाहेर जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडील पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार ता. २ जानेवारी होणाऱ्या मात्र अपरिहार्य कारणामुळे रद्द झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा- करिता निर्गमित करण्यात आलेली प्रवेशपत्र ता. २३ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षाकरिता ग्रह्य धरण्यात येणार आहेत. उमेदवार यांनी काळ्या शाईचे बॉलपॉइंट पेन वापरणे आवश्‍यक आहे. उमेदवारांना एकमेकांचे पेन, लिखाण साहित्य आदी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. सर्व परीक्षार्थी उमेदवार यांनी मुखपट्टी (मास्क), हातमोजे व सॅनिटायजर जवळ बाळगणे अनिवार्य आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रत्येक उपकेंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. परीक्षा उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरातील एसटीडी बुथ, फॅक्‍स मीटर, झेरॉक्‍स दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईचीही सुरावात खराब; चार फलंदाज तंबूत

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT