hasan mushrif criticiz fadanvish
hasan mushrif criticiz fadanvish 
अहमदनगर

फडणवीस, तुम्ही राजभवनावर एखादी रूम घेऊन रहा, म्हणजे तक्रार करायला सोपं जाईल...मंत्री मुश्रीफ यांचा टोला

सकाळ वृत्तसेवा

नगर: कोरोनाच्या परिस्थितीला तोंड देण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विरोधी पक्षनेते करतात.त्याबाबत राज्यपालाकडं सातत्याने तक्रारी करतात. फडणवीस यांना मलबार हिलवरून राजभवनावर जायला वेळ लागतो. त्यामुळं त्यांनी राजभवनावरच एखादी रूम घ्यावी, असं सणसणीत टोला मुश्रीफ यांनी मारला. 

अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले मुश्रीफ आज जिल्ह्यातील करोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधी पक्षावर टीका केली. गेल्या काही दिवसांपासून फडणवीस सातत्यानं राजभवनवर जाऊन राज्यपालांशी चर्चा करत आहेत. तक्रारी करीत आहेत. मंगळवारीदेखील फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नेत्यांनी राजभवनावर राज्यपालांची भेट घेऊन सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप केला. त्यानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी राज्यपालांनी बैठक बोलावली. त्यावरून उलटसुलट चर्चा रंगली होती. त्याच पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी फडणवीसांना चिमटा काढला. 

'मध्य प्रदेशातील राजकारणापायी केंद्र सरकारनं देशातील लॉकडाऊन लांबवलं. राज्य सरकारने कोरोनाचा धोका ओळखून अधिवेशन गुंडाळलं. मात्र, लोकसभेचं अधिवेशन सुरूच होतं. या काळात सुमारे लाख लोक विमानानं भारतात आले. ते मुंबई, दिल्ली, अहमदाबाद अशा सर्वच ठिकाणी गेले. त्या लाख लोकांना वेळीच क्वारंटाइन केलं असतं तर कोटी लोकांना घरात बसावं लागलं नसतं,' असं मुश्रीफ म्हणाले.

राजकारण कसलं करताय

'हे संकट अनपेक्षित आहे. असं काही होईल याची कल्पना कुणालाही नव्हती. तब्बल देश आज कोरोनाशी संघर्ष करताहेत. लस मिळावी, यासाठी प्रयत्न करताहेत. अमेरिका, इटली, फ्रान्स असे देश अडचणीत आले आहेत. त्यामुळं ही राजकारण करण्याची वेळ नाही. तसं कुणी करू नये,' असं मुश्रीफ यांनी सांगितलं. 

आम्ही हे भाजपकडूनच शिकलोय! 
ग्रामविकास विभागाचा निधी देताना भाजपच्या सदस्यांना कमी निधी दिल्याचा आरोप होत असल्याबद्दल मुश्रीफ म्हणाले, 'गेल्या पाच वर्षांत हे आम्ही भाजपकडूनच शिकलो आहोत. त्यांचंच अनुकरण आम्ही करत आहोत. माजी अर्थमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांच्या मतदारसंघातील आकडे पाहिले तर ते स्पष्ट होईल. भाजप सदस्यांना निधी दिला जाईल, पण त्याचे प्रमाण थोडे कमी असेल. झुकतं माप आघाडीच्या सदस्यांनाच राहील 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT