The farmer jumped into the well in front of the officer 
अहिल्यानगर

शेतकऱ्याने अधिकाऱ्यासमोरच टाकली विहिरीत उडी

सतीश वैजापूरकर

शिर्डी ः रुई-निघोज रस्त्याच्या कामादरम्यान पाणी वाहून जाण्यासाठी पाइप टाकण्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. तब्बल 15 वर्षे त्याची मोठी शिक्षा रुई येथील 13 शेतकऱ्यांनी भोगली. रस्त्याचे रूपांतर बंधाऱ्यात झाले.

दर वर्षी पावसाळ्यात शंभर एकरांत पाणी साठून पिके सडू लागली. अर्ज-विनंत्या करून, अधिकाऱ्यांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवून शेतकरी कंटाळले.

आज त्यांच्या संयमाचा बांध फुटला. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रावसाहेब देशमुख यांनी चक्क तुडुंब भरलेल्या विहिरीत अधिकाऱ्यांसमोर उडी घेतली. त्यामुळे अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली.

विहिरीत पोहतच देशमुख यांनी अधिकाऱ्यांसोबत बोलणी सुरू केली. चोवीस तासांत प्रश्न सोडवू, असे आश्वासन त्यांनी दिले. अर्ध्या तासाच्या चर्चेनंतर देशमुख यांनी पोहणे थांबविले व या नाट्यावर पडदा पडला. 

पावसाळ्यात दर वर्षी रुई येथील सर्जेराव वाबळे, कचरू वाबळे, संदीप गमे, दीपक वाबळे, रावसाहेब देशमुख, नारायण मते, चंद्रकांत कुदळे आदींसह 13 शेतकऱ्यांच्या शंभर एकरांत तळे साठते. रस्त्याच्या पलीकडे ओढा आहे. तो या रस्त्याने अडला. पाइप टाकण्याकडे अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला.

गावचे 15 वर्षे सरपंच असलेल्या देशमुख यांनी सलग 15 वर्षे पाठपुरावा केला. यंदा मुसळधार पाऊस होत असल्याने येथील विहिरी जमीनदोस्त झाल्या. तक्रारी केल्यानंतर आज अधिकारी दरवर्षीप्रमाणे पाहणीसाठी आले. त्या वेळी देशमुख यांनी त्यांच्यासमोरच विहिरीत उडी घेतली. शेतातील पाणी ओढ्यात काढले जात नाही तोपर्यंत पोहत राहू, असा पवित्रा घेतला. 

या अनपेक्षित प्रकारामुळे अधिकारी गडबडले. त्यांनी लगेच बोलणी सुरू केली. विहिरीभोवती आपद्‌ग्रस्त शेतकरी कुटुंबीयांसह जमले. देशमुख यांनी पोहतच अधिकाऱ्यांशी बोलणी सुरू केली. एवढेच नाही, तर 15 वर्षांत पहिल्यांदाच दोन जेसीबी रस्त्यावर आले. पाइप घेऊन मालमोटार शेताकडे यायला निघाली, असे अधिकारी सांगू लागले. अभियंता कुलकर्णी यांनी चोवीस तासांत ओढ्यात पाणी काढून देण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले. 

सिमेंटचे 25-30 पाइप टाकण्याचे काम असताना, सरकारी यंत्रणेने आम्हाला 15 वर्षे छळले. निर्दयपणाचे हे जिवंत उदाहरण म्हणावे लागेल. शेतकऱ्यांचे नुकसान पाहूनही अधिकाऱ्यांना पाझर का फुटत नाही? उद्या काय होईल, याची मला अद्यापही खात्री नाही. 
- रावसाहेब देशमुख, माजी सदस्य, जिल्हा परिषद 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT