farmer relief for onion rate good price only if plans while selling onions Sakal
अहिल्यानगर

Onion Rate : शेतकऱ्यांच्या हाती कांद्याचे भाव; विक्री करताना नियोजनाची गरज,दराचा आलेख खाली-वर

बी-बियाण्यांसह खतांसाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज असल्याने अनेक कांदा उत्पादकांनी कांदा विक्रीस आणण्यास सुरुवात केली आहे.

दौलत झावरे

अहमदनगर : कांद्याला सध्या चांगली मागणी असून, भावही चांगला मिळत आहे. आवक वाढली की, कांद्याच्या भावात घसरण होते. कांद्याला आगामी काळात चांगला भाव मिळणे शेतकऱ्यांच्या हाती असून, प्रत्येक शेतकऱ्याने कांद्याचे विक्री करताना नियोजन केले, तरच चांगला भाव मिळेल, अशी आशा सर्वच उत्पादकांना आहे.

जिल्ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावलेली आहे. शेतकऱ्यांनी आता खरिपाच्या तयारीने वेग घेतलेला आहे. बी-बियाण्यांसह खतांसाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज असल्याने अनेक कांदा उत्पादकांनी कांदा विक्रीस आणण्यास सुरुवात केली आहे. त्यातच कांद्याला मागील आठवड्यात तीन हजार रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा ओलांडला होता.

कांद्याला जसा भाव वाढत गेला, तशी आवक वाढत गेलेली आहे. त्याचा परिणाम कांद्याच्या भावावर झालेला आहे. सध्या कांद्याच्या भावात चढ-उतार सुरू आहे. ही चढ-उतार थांबण्यासाठी आवक कमी होणे गरजेचे आहे. त्यानंतरच कांद्याचे भाव स्थिर राहतील, असा अंदाज कांदा उत्पादकांमधून व्यक्त होत आहे. त्याला व्यापारी दुजोरा देत आहेत.

काही वेळा कांद्याची चांगली आवक व्हावी, यासाठी काही ठिकाणी ठरावीक गोण्यांना चांगला भाव काढला जातो. त्या ठरावीक गोण्यांचा भाव तळागाळापर्यंत पोहोचविला जातो. परिणामी पुढील लिलावाला आवक मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे कांद्याची आवक वाढते. त्याचा परिणाम भावावर होत असून, भावात घसरण होते. हा प्रकार नित्याचाच झाला आहे.

शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी

कांद्याला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी कांदा विक्री करू लागले आहेत. काही जण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कांदा खरेदी करीत आहेत. बांदावर कांदा विक्री करताना शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. या अगोदर काहींनी बांधावर कांद्याची खरेदी करून शेतकऱ्यांचे पैसे बुडविलेले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणताना हातराखून आणावा. त्यामुळे कांद्याची आवक कमी राहून मागणी वाढेल. परिणामी कांद्याचे भाव वाढतील. सर्वांनीच कांद्याची विक्री करताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कांद्याला चांगला भाव मिळेल.

- ज्ञानेश्‍वर गोंदकर, सभापती, बाजार समिती, राहाता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imran Khan Death Claim : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू ? पत्रकाराच्या दाव्याने खळबळ

मला आजही महागड्याच.... मोहसीनने दुसऱ्या पत्नीसोबत फोटो शेअर करताच उर्मिला मातोंडकरने मारला टोमणा; पोस्ट करत म्हणाली

Tata Sons N Chandrasekaran : टाटा समूहाला मोठा धक्का? चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्याच्या बातमीने शेअर्स गडगडले, TCS मध्ये मोठी घसरण

Sri Lanka squad for 1st Test vs India: विजय आपलाच... भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून श्रीलंकेच्या दोन स्टार खेळाडूंची माघार; १५ सदस्यीय संघ जाहीर

हातात पिशव्या, पायात चप्पलही नाही... लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी चक्क कंडक्टरसोबत पळाली; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

SCROLL FOR NEXT