Mahapareshan 
अहिल्यानगर

पिकांचे नुकसान केल्याने महापारेषणविरोधात शेतकरी आक्रमक

राजू घुगरे

अमरापूर : तालुक्‍यातील अमरापूर येथे महापारेषणच्या विद्युत मनोऱ्यावर तारा ओढताना पिकांचे नुकसान झाल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडले. भरपाई मिळेपर्यंत काम सुरू होऊ देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. 

अमरापूर येथे महापारेषण कंपनीच्या वतीने 220 केव्ही केंद्राची उभारणी करण्यात आली. या केंद्रास औरंगाबाद जिल्ह्यातील थापटी तांडा येथून वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी थापटी तांडा ते अमरापूरदरम्यान विद्युत मनोरा उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. अमरापूर केंद्राचे कामही दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाले आहे. मनोऱ्यावर वीजवाहिन्या ओढण्याचे काम बाकी होते. ते सध्या ठेकेदाराने सुरू केले आहे. 

तालुक्‍यातील ठाकूर निमगाव परिसरात या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांमुळे व तारांमुळे पिकांचे नुकसान होत असल्याचा आरोप करीत मच्छिंद्र कातकडे, नानासाहेब काकडे, संभा कातकडे, परमेश्‍वर निजवे, पांडुरंग काकडे, बबन खंडागळे, रामेश्‍वर निजवे, जालिंदर निजवे यांच्यासह शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडले. यापूर्वीही या कामामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. आताही तीच स्थिती आहे. त्यामुळे भरपाई मिळाल्याशिवाय काम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. 

विद्युत मनोरा व वीजवाहिन्या ओढण्याच्या कामामुळे दोन ते तीन वेळा शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. संबंधित कंपनी व ठेकेदार शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे केवळ आश्‍वासन देत आहे. भरपाई मिळेपर्यंत पुढील काम होऊ देणार नाही. 
- सुनीता कातकडे, सरपंच, ठाकूर निमगाव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT