onion Google
अहिल्यानगर

आवक घटूनही कांदा बाजार थंडच; शेतकऱ्यांमध्ये नाराजी

मार्तंड बुचुडे

पारनेर (जि. नगर) : कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे गेली तीन महिन्यांपासून कांदा आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. मात्र बाजारभाव प्रतिक्विंटल दोन हजाराच्या पुढे जात नसल्याने कांद्याची आवक घटत चालली आहे. येथील बाजार समितीत आज (बुधवारी) सुमारे नऊ हजार कांदा गोण्याची आवक झाली. मात्र खूप मोठ्या प्रणात आवक कमी होऊनही कांदा बाजार भावात अनेक दिवसांपासून वाढ झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती ही कांदा बाजारासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. या बाजार समितीत खरेदी केलेला कांदा थेट मुंबई, बेंगलोर व दिल्लीसह देशातील विविध राज्यात व मोठ्या शहरातही पाठविला जातो. आज बाजार समितीत फक्त नऊ हजार कांदा गोण्याची आवक झाली. तर प्रथम क्रमांकाच्या कांद्यास फक्त 20 रूपये प्रति किलो म्हणजे दोन हजार रूपये क्विंटल प्रमाणे बाजार भाव मिळाला. तालुक्यात अद्यापही मोठ्या प्रमाणात जुना कांदा शिल्लक आहे. तसेच नवीन कांदाही बाजारात येऊ लागला आहे. मात्र यंदा पाऊस अतिशय कमी प्रमाणात तर काही भागात झालाच नसल्याने नवीन कांद्याचे उत्पादन अतिशय कमी आहे. त्यामुळे नवीन कांदा बाजारात फारसा येणार नाही. ही शक्यात शेतकऱ्यांनी गृहीत धरली आहे. भविष्यात कांद्याचा तुटवडा निर्माण होईल अन् बाजारभाव वाढतील या अशेवर शेतकऱ्यांनी आपला कांदा साठवून ठेवला आहे.

अनेकदा ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान कांदा बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढतात. त्यामुळे शेतकरी साठवलेला कांदा बाजारभाव वाढल्याशिवाय बाजारात आणत नाहीत. मात्र यंदा कांदा आवक कमी होऊनही बाजारभाव वाढताना दिसत नाही. त्यामुळे शेतक-यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे.

कांदा विक्री तोट्यातच

शेतकऱ्यांना कांदा उत्पादनासाठी येणारा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. खताच्या व बियाणाच्या वाढत्या किंमती तसेच मजुरीच्या दरातही झालेली वाढ याचा विचार करता शेतकऱ्यांना कांदा किमान अडीच ते तीन हजार रूपये प्रति क्विंटल दराने विकाला तरच खर्च वसुलीसह शोतकऱ्यांना फायदा होतो. मात्र सध्या अनेक दिवसांपासून कांदा एक दीड हजारा रूपये दरानेच विकला जात आहे. त्यामुळे सध्या तरी शेतकरी कांदा उत्पदनात तोट्यात गेला आहे.

एक तर खरीपाची पिके वाया गेली आहेत. अनेक भागात पाऊस अतिशय कमी झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली आहे. वाटाणा, फुलशेती वाया गेली आहे. दुधाला बाजारभाव नाही. त्याच बरोबर आता कांद्यास बाजारभाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. सरकारने कांदा पिकांस हमी भाव जाहीर करणे गरजेचे आहे.

- रमेश साबळे, अध्यक्ष, कांदा उत्पदक शेतकरी संघटना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT