Farmers got Rs 1.5 crore due to Sujit Jhawar
Farmers got Rs 1.5 crore due to Sujit Jhawar 
अहमदनगर

गायीसाठी एडीसीसी देतेय पैसे, सुजित झावरेंमुळे शेतकऱ्यांना मिळाले दीड कोटी

सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर : कोरोनाचे संकट आणि त्यात अतिवृष्टीसारख्या दुष्टचक्राने हताश झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे धावून आले.

जिल्हा बॅंकेमार्फत संकरित गाय संगोपन योजनेअंतर्गत वासुंदे सेवा संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची तब्बल दीड कोटी रुपयांची कर्जप्रकरणे मंजूर केली. 

वासुंदे (ता. पारनेर) येथे गायी संगोपन योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या रकमेचे धनादेश झावरे यांच्या हस्ते दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. नव्याने दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी जिल्हा बॅंकेकडून कर्ज उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे साकडे वासुंदे येथील शेतकऱ्यांनी सुजित झावरे यांना घातले होते.

झावरे यांच्याकडे सध्या कोणतीही सत्ता नाही, तरीही त्यांनी संबंधितांकडे पाठपुरावा करून वासुंदे सेवा संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची तब्बल दीड कोटी रुपयांची कर्जप्रकरणे मंजूर करून घेण्यात यश मिळविले. धनादेश वाटपप्रसंगी बा. ठ. झावरे, दिलीप पाटोळे, बाळासाहेब झावरे, अंबादास झावरे, किसन वाबळे, गंगाधर गायखे, धनंजय उदावंत, नारायण झावरे उपस्थित होते. 
संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT