Farmers have not yet received compensation 
अहिल्यानगर

शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर ः ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. त्यामुळे सर्व हवालदिल झाले होते. शेतकऱ्यांना दिलासा देत, तातडीने नुकसानीची पाहणी व पंचनामे करूनही अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. 

मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रातील व्यापार, उद्योगावर परिणाम झाला. शेतमालाची विक्री करता न आल्याने, शेतकऱ्यांची आर्थिक हानी झाली. अशा अवस्थेत कोरोनाशी झुंज देत, शेतकऱ्यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत, अपार कष्ट घेत पिके उभारली. मात्र, त्यावरही निसर्गाची अवकृपा झाली.

अतिवृष्टीमुळे शेतातील कांदा, सोयाबीन, कापूस, द्राक्षे, डाळिंबासारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. अकस्मात संकटामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, कृषी व महसूल विभागासह संबंधित खात्याचे मंत्री व अधिकारी, तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. 

संबंधित विभाग व प्रशासनाने वस्तूनिष्ठ पंचनामेही केले. शासनाने या संकटातील शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली. मात्र, दिवाळी होऊन महिना झाला, तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा एक रुपयाही पदरात न पडल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NTA Exam Calendar 2026-27 Out : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! जेईई मेन, यूजीसी-नेटसह प्रमुख परीक्षांच्या तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Shivsena Case : शिंदे गटाला पक्ष, धनुष्यबाण चिन्ह देताना कोणते निकष? सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला थेट सवाल, सुनावणीत नेमकं काय घडलं?

'कौलारू माडी गं, हिरव्या बागा कोकणा...' गाण्यावर वर्षा उसगावकर, किशोरी शहाणे यांचा जबरदस्त डान्स; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणतात-

Latest Marathi News Update : 'निवडणूक आयोगाला आपली घटनात्मक कर्तव्ये पार पाडण्यापासून अनिश्चित काळासाठी रोखले जाऊ शकत नाही'

Manoj Jarange Patil: "विषय फिट बसला!" 58 लाख नोंदींवर जरांगेंचा मोठा दावा

SCROLL FOR NEXT