Farmers have opposed the industrial estate in Phase III at Supe 
अहिल्यानगर

शेती गेली तर आम्ही पोट कसे भरणार? सुपे, हंगे येथील शेतकऱ्यांचा एमआयडीसीला जमीन देण्यास नकार

सकाळ वृत्तसेवा

पारनेर (अहमदनगर) : आम्ही पिढ्यान्‌ पिढ्या शेती करीत आहोत. शेतीशिवाय उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. शेती गेली तर आम्ही पोट कसे भरणार? आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. अख्खे गाव भूमिहीन होईल, अशी भूमिका घेत सुपे येथील फेज-थ्रीमधील औद्योगिक वसाहतीस शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला. 

सुपे व हंगे शिवारातील नियोजित फेज-थ्री एमआयडीसीबाबत सुपे येथे शेतकऱ्यांच्या हरकतीवर एमआयडीसीचे विभागीय अधिकारी नितीन गवळी, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे यांनी सुनावणी घेतली. एमआयडीसीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची भूमिका जाणून घेतली. सुपे व हंगे शिवारात सुमारे 835 हेक्‍टरवर एमआयडीसीचा तिसरा फेज सुरू होत आहे. त्यासाठी भूसंपादन केले जाणार आहे. मात्र, एमआयडीसीला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे. त्यासाठी 282 शेतकऱ्यांनी हरकती नोंदविल्या आहेत. त्यावर झालेल्या सुनावणीत अनेक शेतकऱ्यांनी पोटतिडकीने आपल्या व्यथा मांडल्या. 

हंगे येथील तलावावर सुमारे पाच गावांची पाणीयोजना आहे. एमआयडीसीमुळे ती धोक्‍यात येईल. गावातील अनेकांच्या जमिनी पूर्वीही एमआयडीसीसाठी गेल्या. प्रत्येक वेळी आम्हीच का त्याग करावा? अख्खे गाव भूमिहीन होईल, अशी भीती माजी सरपंच राजू शिंदे यांनी मांडली. अनेक शेतकऱ्यांनी तर, आम्ही अधिकाऱ्यांना या परिसरात फिरकूही देणार नाही. त्यातून काही अघटित घडले तर त्यास सरकारी अधिकारीच जबाबदार असतील. आम्हाला पैसे नकोत, आमची जमीन हीच आमची काळी आई आहे, तीच आमचे पिढ्यान्‌ पिढ्या पालनपोषण करीत आली. आता आमच्या मुलांना भूमिहीन करून भिकारी करू नका,' अशी याचना केली. 

माझ्याकडे अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. ही जागा एमआयडीसीसाठी योग्य नाही. त्यापेक्षा ढवळपुरी परिसरात मोठ्या प्रमाणात खडकाळ व नापिक जमीन आहे. तेथे एमआयडीसीसाठी हवी तेवढी जागा देऊ. तेथे या वसाहतीचा तिसरा फेज सुरू करावा. 
- नीलेश लंके, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vedanta Share: एका दिवसात Vedanta कंपनीचे शेअर्स तब्बल 62 टक्यांनी घसरले! नेमकं कारण काय?

DJ Noise Incident : लग्नाच्या वरातीतील डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा, १४० कोंबड्यांचा तडफडून मृत्यू

Latest Marathi News Live Update : पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलन

Congress MLC Candidate Maharashtra : तीन वाजेपर्यंत थांबा काँग्रेसचा उमेदवार समजेल, नाना पटोले स्पष्टच म्हणाले; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरही भाष्य

Bank News: कामाची बातमी! 1 मे ला बँका बंद की सुरू? RBI ची मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT