Latest Marathi News Live Update : मतमोजणी केंद्रात पेन, कागद नेण्यास पोलिसांचा मज्जाव; प्रभाकर देशमुख निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार

Breaking Marathi News Live Update : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Maharashtra Latest Marathi News Live Update

Maharashtra Latest Marathi News Live Update

esakal

Prabhakar Deshmukh LIVE : मतमोजणी केंद्रात पेन, कागद नेण्यास पोलिसांचा मज्जाव; प्रभाकर देशमुख निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार

पुणे : मतमोजणी केंद्रात उमेदवारांच्या प्रतिनिधींना पेन आणि कागद घेऊन जाण्यास पोलीस परवानगी देत नसल्याची तक्रार प्रभाकर देशमुख यांनी केली आहे. पोलिसांकडून उमेदवारांच्या प्रतिनिधींना सहकार्य केले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला. “मतमोजणी केंद्रात पेन आणि कागद घेऊन जाऊ दिले जात नसतील, तर आम्ही मतमोजणी नेमकी कशी करायची?” असा सवाल प्रभाकर देशमुख यांनी उपस्थित केला. या प्रकाराबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रभाकर देशमुख हे पुणे पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख यांचे वडील आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com