Farmers will get a loan of Rs 1.5 lakh for cows 
अहिल्यानगर

शेतकऱ्यांना गायींसाठी मिळणार दीड लाखांचे कर्ज

दत्ता इंगळे

नगर तालुका ः जिल्हा सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाने 2020-21 हंगामाकरिता पशुपालन, पक्षीपालन, मत्स्यव्यवसाय, शेळी-मेंढी पालनासाठी खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली.

प्रत्येकी 15 हजार रुपयांप्रमाणे 10 गायींकरिता दीड लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज शेतकऱ्यांना अल्प व्याजदरात देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.

सेवा सहकारी संस्थांच्या सचिवांनी प्रत्येक गावातून किमान 50 शेतकऱ्यांची प्रकरणे पाठवावीत, असे आवाहन माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केले. 

नगर तालुका विकास अधिकारी कार्यालयातर्फे सेवा संस्थांच्या सचिवांच्या बैठकीत कर्डिले बोलत होते. संचालक रावसाहेब शेळके, तालुका विकास अधिकारी आनंद शेळके, शेतीकर्ज व्यवस्थापक संजय बर्डे, आस्थापन विभागप्रमुख शैलेश बोधले, गजेंद्र क्षीरसागर, महादेव कराळे, सुनील काळे, सुनील भांड, राजेश नामदे, रामदास सोनवणे आदी उपस्थित होते. 

कर्डिले म्हणाले, ""कोरोनामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यांना आधार देण्यासाठी जिल्हा बॅंकेने विविध निर्णय घेतले आहेत. संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी, तसेच हे निर्णय शेतकऱ्यांना समजावून सांगावेत. प्रत्येक गावातून किमान 50 कर्जप्रकरणे पाठवावीत.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT