Farmers will no longer be deceived by traders 
अहिल्यानगर

आता शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणार नाही फसवणूक, पोलिसांनी आखला प्लॅन

गौरव साळुंके

श्रीरामपूर ः परराज्यांसह विविध जिल्ह्यांतील व्यापाऱ्यांकडून तालुक्‍यातील शेतकऱ्यांची वारंवार होणारी फसवणूक रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने लक्ष घातले आहे. या संदर्भात शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलिस अधिकारी आयुष नोपाणी यांनी तालुक्‍यातील कामगार पोलिस पाटील संघटनेला निवेदनाद्वारे सूचना केल्या आहेत.

तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील अनेक शेतकरी आपला शेतमाल परराज्यांसह विविध जिल्ह्यांतील अनोळखी व्यापाऱ्यांना विक्री करतात. त्यात विविध ठिकाणच्या व्यापाऱ्यांकडून तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अनेकांना शेतमालाचे पैसे म्हणून धनादेश देण्यात आले.

हे धनादेश बॅंकेत भरण्यासाठी गेल्यानंतर ते रद्द होतात, तसेच संबंधित व्यापाऱ्याचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक खोटे असल्याचे समोर आले. त्यामुळे शेतकऱ्यांकडे संबंधित व्यापाऱ्यांची कुठलीही माहिती किंवा ओळख नसल्याने, स्थानिक पोलिसांना कारवाई करताना अडथळे येतात. 

परिणामी, शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. त्यामुळे तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी परराज्यांसह अन्य जिल्ह्यांतील व्यापाऱ्यांना शेतमालाची विक्री करताना संबंधितांचे आधार कार्ड, पॅनकार्ड पडताळून व्यवहार करावेत, तसेच व्यवहाराचा एक धनादेश जपून ठेवावा. त्यामुळे संबंधित व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यास पोलिसांना मदत होईल.

परराज्यांतील व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक रोखण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी याबाबंत सतर्कता राखण्याचे आवाहन वरिष्ठ पोलिस अधिकारी आयुष नोपाणी यांनी केले आहे.अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत १२ हजार सरकारी कर्मचाऱ्यांची धक्कादायक कारस्थानं! कोट्यवधी उडवले; आता सरकारने मोठा निर्णय घेतला

Who is Sanjay Singh? लुंगी एनगिडी कोसळला, Ambulance आली; पुढे ९ किमीच्या अंतरात काय घडले? २८ सेकंदाचा थरारक Video

Mumbai: मराठी भाषेचा वाद चिघळला! मनसेच्या ११ कार्यकर्त्यांना अटक, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Cooler Safety Tips : कूलर बनला जीवघेणा! एका व्यक्तीचा मृत्यू; घरी कूलर वापरताना अजिबात करू नका 'या' 5 चूका

मुंबई-गोवा महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात, ९७ टक्के झालं; उर्वरित मे पर्यंत पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT