FD in the bank will name all the girls 
अहिल्यानगर

मुलगी झाली हो... बापासोबत गावही आनंदात नाचले! सर्व मुलींच्या नावे करणार बँकेत एफडी

संजय आ. काटे

श्रीगोंदे : "ती'चे आगमन होताच घरच्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. "ती' प्रत्यक्षात घरी येण्यापूर्वी तर स्वागतासाठी साऱ्या गावाचीच धावपळ सुरू झाली. रस्त्यावर फुलांचा सडा पडला. दारोदारी रांगोळ्या रेखाटल्या गेल्या. फटाक्‍यांच्या आतषबाजीत "ती'च्या स्वागतासाठी सगळे गाव एकत्र आले. 
आढळगाव (ता. श्रीगोंदे) येथील गुगळे कुटुंबात आठ वर्षांनी कन्यारत्न झाले.

हा आनंद या एकट्या कुटुंबाने नव्हे, तर अख्ख्या गावाने साजरा केला. तरुण उद्योजक नीलेश गुगळे व त्यांच्या पत्नी पूजा यांना कन्यारत्न झाले. "मुलगी नको' म्हणून सोनोग्राफी करून गर्भातच कळी खुडणाऱ्यांसाठी ही घटना डोळ्यांत अंजन घालणारी आहे. 
गुगळे कुटुंबात मुलीचे आगमन झाल्याचे समजताच सरपंच शिवप्रसाद उबाळे, अनिल ठवाळ, सुभाष गांधी, उत्तम राऊत हे गावातील प्रमुख एकत्र आले.

अंगणवाडी सेविका ताराबाई खराडे व त्यांच्या सहकारी तिच्या स्वागतासाठी सकाळपासून कष्ट घेत होत्या. त्यांच्यासमवेत गावकरीही या स्वागतासाठी सरसावले. 
ती मोटारीतून उतरताच फटाक्‍यांची आतषबाजी सुरू झाली. तत्पूर्वी ती ज्या रस्त्याने येणार, त्यावर फुलांचा सडा, रांगोळी घालण्यात आली होती. स्वागताची सगळी तयारी झाली होती. ती येताच तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी अनेकांची लगबग सुरू झाली. जिलेबीचे जेवण देत शुभेच्छा सुरू होत्या. या अभूतपूर्व स्वागताने गुगळे कुटुंब भारावून गेले होते. हा सोहळा पाहणाऱ्यांचे डोळे आनंदाने पाणावले होते. सतीश गुगळे यांनी गावकऱ्यांचे आभार व्यक्त करताना, "मुलगी नको' असे म्हणणाऱ्यांना आजचे स्वागत म्हणजे चपराक असल्याचे सांगितले. 

मुलींच्या नावे करणार एफडी 
मुलीचा जन्म झाल्यावर असा आनंददायी सोहळा सगळ्या गावांमध्ये साजरा व्हावा, अशी इच्छा व्यक्त करीत सरपंच उबाळे यांनी, गावात जन्मलेल्या प्रत्येक कुटुंबातील मुलीला एक हजार रुपयांची भेट देणार असल्याची घोषणा केली. मुलीच्या नावावर बॅंकेत पैसे टाकून ते तिला 18 वर्षांनंतर मिळतील अशी व्यवस्था करण्याचे नियोजन झाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT