korona 
अहिल्यानगर

पाहुण्यांनी धडकी भरवली 

दौलत झावरे

नगर : कोरोनाचा प्रादुर्भाव शहरांत वाढल्याने अनेकांनी गावचा रस्ता धरला. मात्र, शहरांतून आलेले अनेक जण कोरोनाबाधित आढळत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. "या पाहुण्यांना आता थांबवा हो,' अशी मागणी होत आहे. 

मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक आदी जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. नोकरी- व्यवसायानिमित्त अनेक जण त्या शहरांत स्थायिक झाले. मात्र, कोरोनाच्या धास्तीने आता ते गावाकडे परतत आहेत. त्यांतील काही मंडळी तपासणी करून व गावात आल्यानंतर विलगीकरण कक्षात थांबत आहेत.

मात्र, काही जण रात्री-अपरात्री चोरवाटांनी गावात येऊन थेट घरी पोचत आहेत. त्यामुळे सर्वच ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे. ही मंडळी रात्री-अपरात्री येते कशी? त्यांना कोण आणून सोडते? जिल्ह्याच्या सरहद्दीवर बंदोबस्तासाठी असलेले पोलिस व कर्मचारी करतात काय, असे एक ना अनेक प्रश्‍न यातून उपस्थित होत आहेत. 

जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून, बाहेरून आलेले नागरिकच कोरोनाबाधित आढळून येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पाहुण्यांना गावाबाहेरच ठेवा, नाही तर त्यांना शहरातच थांबवा, अशी मागणी होत आहे. 

जिल्ह्याच्या हद्दीवर बंदोबस्त वाढवा 
जिल्ह्याच्या हद्दींवर तपासणी केली जात असली, तरी अनेक जण बाहेरील जिल्ह्यांतून रात्रीच्या वेळी येत आहेत. हा प्रकार थांबला नाही, तर कोरोनाचा कहर कमी होण्याऐवजी वाढणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमांवरील बंदोबस्त आणखी कडक करावा. विशेषत: रात्रीचा बंदोबस्त वाढविण्याची मागणी होत आहे. 

शहरातून आल्यावर तपासणी गरजेची 
शहरातून गावात येताना वैद्यकीय तपासणी करून रुग्णालयाकडून प्रमाणपत्र घेऊन येतात. मात्र, हे प्रमाणपत्र त्यांना तपासणी झाली त्या वेळी कुठलाही त्रास होत नसल्याबाबतचे आहे. प्रवासात त्यांना काही बाधा झाली, तर त्याचा या प्रमाणपत्राशी काही संबंध येत नाही. त्यामुळे शहरातून आल्यावर प्रत्येकाने तपासणी करून, खबरदारी म्हणून विलगीकरण कक्षात राहणे गरजेचे आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

६ महिन्यांच्या चिमुकल्यावर कुत्र्याचा हल्ला, पिटबुल नव्हे तर American Bully; मालक म्हणाला, उपचारावर ४ लाख खर्च केले

Ajit Agarkar Salary : अजित आगरकरने BCCI कडून किती पगार घेतला? त्याच्या कार्यकाळात भारताची कामगिरी कशी झाली? Report Card

Shah Rukh Khan FDA Notice : तुकाराम मुंढे शाहरुख खानवर कारवाई करणार? FDA च्या नोटीसीला उत्तर न दिल्याने पुढील प्रक्रिया सुरू

6:30 वाजता WFH करण्यास सांगितलं, 9:30 वाजता Google Meetची लिंक आली अन् अवघ्या 5 मिनिटांत 80 जणांची नोकरी गेली; नक्की काय घडलं?

अकरावीत आईला म्हणाल्या मला रुचीरशीच लग्न करायचंय! मृणाल कुलकर्णी यांनी प्रेमासाठी केलेली बंडखोरी, अशी खुललेली लव्हस्टोरी

SCROLL FOR NEXT