

Shah Rukh Khan ajay devgan FDA Notice tukaram mundhe
esakal
FDA notice to Shah Rukh Khan : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या थेट कारवायांमुळे सध्या अन्न प्रशासन विभाग चर्चेत आहे. हॉटेल, मिठाईची दुकाने, क्लब, कॅन्टिन आणि रुग्णालयांनंतर आता बॉलिवूडमधील शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ हेही FDA च्या कारवाईच्या कक्षेत आले आहेत. प्रतिबंधित उत्पादनांच्या अप्रत्यक्ष जाहिरातीप्रकरणी या तिन्ही अभिनेत्यांना अन्न प्रशासन विभागाच्या ग्रेटर मुंबई विभागाने ११ ऑगस्ट रोजी नोटीस बजावली होती.