Fighting between the two at grain stores 
अहिल्यानगर

धान्य दुकानदारांमधील जिरवाजिरवीने उघड झाला "मलिदा"

सचिन सातपुते

शेवगाव : तालुक्‍यातील स्वस्त धान्य दुकानदारांतील अंतर्गत संघर्ष टोकाला गेल्याने त्याचे पडसाद थेट तहसील कार्यालयातील हाणामारीपर्यंत पोचले. सुरवातीला कमिशन, काळा बाजार, वर्चस्व, कारवाई यातील हेव्यादाव्यांच्या मुद्द्यावरून ही लढाई थेट कार्यालयात गुद्द्यांपर्यंत पोचल्याने तहसील कार्यालय, पुरवठा विभाग व स्वस्त धान्य दुकानांतील सावळा गोंधळ समोर आला. 

तालुक्‍यातील स्वस्त धान्य दुकानांत येणारे धान्य व त्याचा होणारा काळा बाजार वारंवार उघडकीस येत असल्याने, जिल्ह्यात शेवगावचा पुरवठा विभाग बदनाम झाला आहे. एक वर्षापासून दोन दुकानदारांतील संघर्ष तालुक्‍यातील सर्वच दुकानदारांपर्यंत पोचला आहे. दुकानदारांमध्ये दोन गट पडले आहेत. त्यातच अधिकारी व कर्मचारी ज्या गटाच्या बाजूने उभे राहतात, त्यांना एखाद्या प्रकरणात अडकवून बाजूला केले जाते.

पूर्वी एका गटाच्या ताब्यात असलेले धान्य गोदाम आता दुसऱ्या गटाच्या ताब्यात गेल्याने, धान्याचा काळा बाजार करून उदयास आलेल्या अनेकांना ते रुचलेले नाही. 

एकमेकांना अडचणीत आणणारी माहिती काढून त्या भांडवलावर दुकानदार व अधिकाऱ्यांच्या विरोधात वरिष्ठ कार्यालयास निवेदन देणे, आंदोलन करणे, कारवाईच्या धमक्‍या देणे, असे प्रकार वारंवार सुरू असतात. अधिकाऱ्यांचेही हात यात बरबटलेले असल्याने, त्यांचीही अवस्था "धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय' अशी झाली आहे.

दोन-तीन दिवसांपूर्वी थेट तहसीलदारांच्या दालनासमोर झालेल्या "लढाई'मुळे पुरवठा विभागासोबतच महसूल विभागाचीही बदनामी झाली. त्यातच अधिकाऱ्यांनी एकाच गटाची बाजू घेत दुसऱ्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी केलेली घाई चर्चेचा विषय ठरली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहली, शुभमन गिलचे शतक, टीम इंडियाचा पहिल्या वन डेत दणदणीत विजय; मालिकेत आघाडी

Praniti Shinde: दुष्काळ जाहीर केला, पण आर्थिक मदत कुठे?’; मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदेंचा सरकारवर निशाणा

Nagpur Crime: साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी पाठलाग; हद्दपार आरोपीने तेलमालिश करणाऱ्यावर चाकूने केले तीन वार

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीची Century! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; ७४ चेंडूंत इतिहास भूगोल बदलला...

SCROLL FOR NEXT