shripad chindam esakal
अहिल्यानगर

वादग्रस्त वक्तव्य प्रकरण : छिंदमविरुद्ध दोषारोपपत्र दाखल

गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला बडतर्फ माजी उपमहापौर श्रीपाद शंकर छिंदम (वय ३५) याच्या विरोधात न्यायालयात ६० पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. छिंदम याने महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांना दूरध्वनी करून वाद घातला होता, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अनुद्‌गार काढले होते. याबाबतची ऑडिओ क्‍लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. याप्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. (filed-Chargesheet-against-Shripad-Chhindam-for-Controversial-statement-case-jpd93)

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य प्रकरण

छिंदम हा महापालिकेच्या उपमहापौर या शासकीय पदावर असल्याने भारतीय दंड संहिता कलम १९६ (१) (अ) प्रमाणे तोफखाना पोलिसांनी गृह विभागाकडे दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी मागितली होती. गृह विभागाचे उपसचिव संजय खेडेकर यांनी शनिवारी परवानगी दिल्यानंतर तोफखाना पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक तथा तपासी अधिकारी किरण सुरसे यांनी आज (सोमवारी) न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. ६० पानांच्या या दोषारोपपत्रात सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.

आवाजाच्या नमुन्याचाही समावेश

पोलिसांनी ऑडिओ क्‍लिपमधील आवाज आणि श्रीपाद छिंदम याच्या आवाजाचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल आला असून, तोदेखील पोलिसांनी दोषारोपपत्रासोबत जोडला आहे.

छिंदम बंधूंच्या गुन्हेगारीचा वाढता आलेख

श्रीपाद व श्रीकांत छिंदम बंधूंवर गेल्या चार-पाच वर्षांपासून अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात जमाव जमवून त्या माध्यमातून मारहाण करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, जातिवाचक शिवीगाळ करणे आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. दोघांवर एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay Support AIADMK : तामिळनाडूत महाराष्ट्रासारखी फूट! आण्णा द्रमुकचे दोन भाग; थलपती विजयला थेट पाठिंबा

Pune Grand Tour: ‘पुणे ग्रँड टूर’चे रस्तेही खराब; १६५ कोटींचे काम खोदाईमुळे वाया, नियमांचे उल्लंघन, काम पूर्ण होऊनही दुरुस्ती नाही!

'नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न केले, पण…' ‘कमळी’ फेम अभिनेत्रीने सांगितला बाळंतपणाचा अनुभव, म्हणाली... 'त्या क्षणी खूप रडले…'

PM मोदींनी केलेल्या अचानक घोषणे बद्दल काय आहे शरद पवारांचे मत? केली मोठी भविष्यवाणी

Raj Thackeray criticism narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले 'भुर्दंड जनतेला का ?'

SCROLL FOR NEXT