Financial loss due to closure of temple at Shanishinganapur 
अहिल्यानगर

शनिआमावस्येला देऊळ बंदमुळे पाच कोटींची उलाढाल हुकली

सकाळ वृत्तसेवा

सोनई (अहमदनगर): शनिशिंगणापूर येथील शनिअमावस्या यात्रा रद्द झाल्याचा मोठा आर्थिक फटका व्यावसायिक व देवस्थान ट्रस्टला झाला आहे. दुस-या टप्प्यातील कोरोना स्थितीमुळे यात्रा रद्द करीत 'देऊळ बंद' केल्याने पाच कोटी रुपयांची उलाढाल हुकल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. 

माघ महिन्यात आलेल्या या दर्श अमावस्या यात्रेला दहा ते बारा लाख भाविकांची गर्दी झाली असती. मात्र कोरोना संसर्गाची वाढती स्थिती लक्षात घेवून देवस्थान ट्रस्ट,ग्रामपंचायत व प्रशासनाने यात्रा रद्दचा निर्णय घेतला होता. शुक्रवारी दुपारी तीन वाजता मंदीर बंद करण्यात आले. महाद्वार परीसरात पोलिस व सुरक्षा कर्मचारी तैनात करुन सर्व भाविकांना प्रवेश रोखण्यात आला.शनिवारी पहाटे आरती सोहळा झाल्यानंतर बंदोबस्त वाढविण्यात आला. 

मागील वर्षी कोरोनामुळे दहा महिने मंदीर बंद होते.अमावस्या यात्रेची सर्वांना आशा होती.मात्र यात्रा रद्द झाल्याने सर्वांचीच आर्थिक कोंडी झाली आहे. यात्रा भरली असती तर दहा ते बारा लाख भाविकांची गर्दी होवून तीस हजार लिटरहून अधिक तेल शनिमुर्तीवर पडले असते.निवास,चहा नाश्ता, जेवणाचे हाॅटेल, पुजा साहित्य, वाहतुक व देवस्थानला
देणगी मोठ्या प्रमाणात भेटली असती.

शुक्रवारी रात्री बारा वाजता उद्योजक सौरभ बोरा,
शनिवारी पहाटे माजी खासदार चंद्रकांत खैरे व डाॅ.राहुल हेगडे यांच्या हस्ते आरती सोहळा झाला. देवस्थानच्या चारशे वर्षाच्या इतिहासात प्रथमच यात्रेचा दिवस सुनासुना राहिला.दोन दिवसात अंदाजे फक्त दहा ते पंधरा हजार भाविक कळस व महाद्वाराचे लांबून दर्शन घेवून परतले.

प्रशासनाच्या सुचनेनंतर देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदीरातील प्रवेश पुर्णपणे बंद ठेवला होता.कोरोना संसर्गाची काळजी घेण्यात आली.देणगी,प्रसाद विक्रीसह सर्व उत्पन्नावर मोठा परीणाम झाला.
- नितीन शेटे,कार्यकारी अधिकारी, शनैश्वर देवस्थान 

वीस वर्षापासून अमावस्या यात्रेची खेट चुकविली नव्हती.यात्रा रद्द असतानाही फक्त या पावनभुमीत येवून बाहेरूनच कळसाचे दर्शन घेतले.कोरोनाची स्थिती लक्षात घेवून घेतलेला निर्णय योग्यच आहे. 
- प्रमोद मित्रा,चारकोप,मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, RR vs CSK: राजस्थानच्या तिखट माऱ्यापुढे चेन्नईचे फलंदाज हतबल; पण ओव्हर्टनच्या खेळीनं १२० धावा पार

Aadul Rain : आडूळ परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान

Ambad lightning : अंबड शहरासह परिसरात वादळ, वाऱ्यासह गारा; वीज पडुन दोन युवकांचा मृत्यू

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला गारपिटीचा ऑरेंज अलर्ट; तर उर्वरित राज्याला वादळी पावसाचा इशारा

बिहारमध्ये सत्तेचा मोठा ट्विस्ट! नितीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर नवे मुख्यमंत्री कोण? ४ दिग्गज नेते रेसमध्ये; कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT