अहिल्यानगर

अहमदनगर - जिल्हा रुग्णालयात अग्नी तांडव; दहा जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

जिल्हा रुग्णालयाच्या आय़सीयूमध्ये भीषण आग लागून दहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

अहमदनगर - जिल्हा रुग्णालयाच्या आय़सीयूमध्ये भीषण आग लागून अनेकजण होरपळले आहेत. यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आज सकाळी ही आग लागली. यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तर एकाची प्रकृती गंभीर आहे.

ICU विभागाला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. तातडीने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आली. मात्र अचानक आग लागल्याने रुग्णालयातील रुग्ण दुसऱ्या ठिकाणी हलावताना सिव्हिल कर्मचारी यांची धावपळ झाली. २० रुग्ण या ICU विभागात असल्याचे बोलले जात आहे.

मृतांची नावे

रामकिसन विठ्ठल हरपुडे( वय ७०), सिताराम दगडू जाधव (८३), सत्यभामा शिवाजी घोडचौरे( ६५)य, कडूबाळ गंगाधर खाटीक (६५), शिवाजी सदाशिव पवार (८२) , दीपक विश्वनाथ जेडगुले (५७), कोंडाबाई मधुकर कदम (७०), आसराबाई नांगरे (५८ ), छबाबी अहमद सय्यद (६५) व एक अनोळखी असा चार महिला व सहा पुरुषांचा दुर्घटनेत मृत्यू झाला.

सिव्हिल रुग्णालयाच्या आयसीयू विभागात आग लागली. त्यावेळी आयसीयूमध्ये २० जण उपचार घेत होते. आगीतून काही रुग्णांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसंच रुग्णालयात नर्स, वॉर्ड बॉय आणि डॉक्टरांनी रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. अतिदक्षता विभाग आला शॉर्टसर्किटमुळे आग लागली आहे त्यामुळे काही रुग्ण भाजले गेले याची प्राथमिक माहिती आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT