First award in the country for Shrirampur Rural Hospital 
अहिल्यानगर

श्रीरामपूर ग्रामीण रूग्णालय देशात पहिले, कायाकल्प पुरस्कार पटकावला

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर ः केंद्र सरकारच्या 'कायाकल्प' पुरस्कारने येथील ग्रामीण रुग्णालयास सलग तिसऱ्यांदा सन्मानित करण्यात आले. 'कायाकल्प' पुरस्कारासाठी राज्यासह देशभरातून प्रथम येण्याचा मान येथील ग्रामीण रुग्णालयाला यंदा मिळाला आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत 'कायाकल्प' पुरस्कारासाठी राज्यासह देशभरातील सलग तिसरयांदा येणारे येथील ग्रामीण रुग्णालयाने एकमेव ठरले आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत देशभरातील आणि राज्यातील विविध आरोग्य संस्थाना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 'कायाकल्प' योजना राबविली जाते.

पुरस्कारामार्फत गरजु, गरीब रुग्णांसह सामान्य नागरीकांना दर्जेदार आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आरोग्य संस्थांना प्रोत्साहन दिले जाते. गुणवत्तावर्धक रुग्णसेवा देणारया राज्यासह देशभरातील विविध आरोग्य संस्थाच्या त्रिस्तरीय समितीमार्फत पुरस्कारासाठी मुल्याकंन केले जाते. 
त्यात जिल्हा रुग्णालय विभाग, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय विभाग, स्त्री रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश करण्यात आला आहे.

पुरस्काराच्या मुल्याकंनासाठी नगर जिल्हयातील श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय देशासह राज्यपातळीवर पात्र ठरले आहे. मागील दोन वर्षापासुन आणी यंदाही येथील ग्रामीण रुग्णालय कायाकल्प पुरस्कारासाठी निवड झाली आहे. रुग्णालयाला यंदा राज्यासह देशातुन प्रथम क्रमांक मिळाला. यंदाच्या पुरस्कासाठी मार्च 2020 मध्ये मुल्याकंन करण्यात आले होते. त्यामध्ये ग्रामीण रुग्णालयाला 100 पैकी 100 गुण मिळाले. राज्यासह देशात सलग तिसरयांदा प्रथम पुरस्कार पटकाविला आहे.

कायाकल्प पुरस्काराचे स्वरुप 15 लाख रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र आहे. ग्रामीण रुग्णालयाने मागील वर्षी मिळालेल्या पुरस्काराची रक्कम कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्री सहायत्ता निधीसाठी जमा केली होती. त्यानंतर रुग्णालयात व्यवस्थानाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

या निमित्त ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणाले, ग्रामीण रुग्णालयाला मिळालेला कायाकल्प पुरस्कार सामान्य नागरीकांसह लोकप्रतिनिधी आणि आरोग्य यंत्रणेच्या सातत्यपूर्ण परिश्रमामुळे मिळाला आहे. त्यात रुग्णांच्या मानसिक परिवर्तनाचा मोलाचा वाटा आहे.

सलग तिसरयांदा मिळालेला पुरस्कार हा सर्वसामान्य नागरीकांना समर्पित केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सलग तिसरयांदा ग्रामीण रुग्णालयाला कायाकल्प पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचार्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा ! शेतकऱ्याची जमीन हडपली, पोलिसांकडे तक्रार करताच सुपारी देऊन हत्या

Gopikishan Bajoria: पक्षाच्या वाढीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे: माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया; चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश!

Numerology : 'या' 3 मूलांकाच्या मुली असतात सर्वांत जास्त साध्याभोळ्या; साक्षात लक्ष्मीचे रूप बनून बदलतात जोडीदाराचे आयुष्य

Latest Marathi News Live Update : मुंबई गोवा महामार्गावर आंबा काजू बागायतदारांचे चक्काजाम आंदोलन

Pune Magarpatta Canal Burst : मगरपट्टा परिसरात कालवा फुटला; 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' पर्यायी मार्ग नक्की पाहून घ्या...

SCROLL FOR NEXT