The first installment of kharif compensation is credited to the farmers account 
अहिल्यानगर

खरीप नुकसान भरपाईचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग

सचिन सातपुते

शेवगाव (अहमदनगर) :अतिवृष्टीमुळे तालुक्‍यातील खरीप पिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईपोटी राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीचा 22 कोटी 71 लाख रुपयांचा पहिला हप्ता 53 गावांतील 29 हजार 405 शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. 

रब्बी पिकाच्या तयारीसाठी मिळालेले हे अनुदान शेतकऱ्यांना उपयोगी पडणार असले, तरी उर्वरित गावांतील शेतकऱ्यांना मात्र दुसऱ्या टप्प्याच्या मदतीसाठी वाट पाहावी लागणार आहे. यंदा जूनपासून तालुक्‍यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील कपाशी, तूर, सोयाबीन, कांद्यासह ऊस व फळबागांचे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले पीक हातातून गेल्याने, केलेला खर्च वाया गेला. सरकारने नुकसानीची दखल घेऊन नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. 

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही तालुक्‍याचा दौरा करून पिकांसाठी हेक्‍टरी 10 हजार, तर फळपिकासाठी 25 हजार रुपयांप्रमाणे मदत जाहीर केली. तालुक्‍यातील 73 हजार 279 शेतकऱ्यांच्या 48 हजार हेक्‍टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून, त्यात कपाशी 70 हजार 802, तूर 4 हजार 810, कांदा 1 हजार 895, भुईमूग 810, आले 340, केळी 71, पपई 30, फळपिके 231 हेक्‍टर आदींचा समावेश आहे. 

सरकारकडून नुकसान भरपाईपोटी तालुक्‍याला 48 कोटी 50 लाखांचा निधी मिळणे आवश्‍यक आहे. त्यातील पहिल्यात टप्प्यात 24 कोटी 23 लाख रुपये तालुका प्रशासनाला प्राप्त झाले. त्याचे 53 गावांतील 29 हजार 405 शेतकऱ्यांच्या 22 हजार 800 हेक्‍टर बाधित पिकांसाठी 22 कोटी 71 लाख रुपये बॅंक खात्यांवर वर्ग केले आहेत. उर्वरित गावांतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम प्राप्त होताच दुसऱ्या टप्प्यात वितरित केली जाणार असल्याचे तहसीलदार अर्चना भाकड यांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray UPI : युपीआयवरील MDR म्हणजे ‘डिजिटल सापळा’; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, व्यापाऱ्यांना शुल्क न भरण्याचं आवाहन

पदराने अचानक पेट घेतला, केसांपर्यंत आग गेली! जुई गडकरीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग, म्हणाली...'पाठीला जोरात चटका बसला अन्...'

कौटुंबिक वाद विकोपाला! भांडणात पतीच्या गुप्तांगाला चावा घेतला, संतापलेल्या पतीने पत्नीचं थेट नाक कापलं; घटनेने खळबळ

Iran Execution : इराणने मोसादच्या गुप्तहेराला दिली फाशी, इस्त्रायलला संवेदनशील लष्करी माहिती पुरवल्याचा आरोप

Mumbai: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत थांबलेल्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; जळगावच्या जयदीप नेमाडे यांचा दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT