For the first time in history, this is happening on Independence Day 
अहिल्यानगर

इतिहासात प्रथमच स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी असं घडतंय

अमित आवारी

नगर ः जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. यात उद्या (शुक्रवारी) कोरोनासंदर्भातील आढावा बैठक आणि शनिवारी (ता. 15) त्यांच्या हस्ते शासकीय ध्वजवंदनाचा कार्यक्रम होणार आहे.

पालकमंत्री मुश्रीफ उद्या (शुक्रवारी) दुपारी 12 वाजता राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या समवेत हिवरेबाजार येथील पाणलोट विकासकामांची पाहणी करतील.

वृक्षारोपण कार्यक्रम व ग्रामविकासाबाबत चर्चा करतील. दुपारी तीन वाजता जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील कोरोना स्थितीबाबत आढावा बैठक घेतील. या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, तसेच जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदार, वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (ता. 15) सकाळी 9 वाजता पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत ध्वजवंदनाचा कार्यक्रम होईल. 

यंदाचे ध्वजवंदन सोशल डिस्टन्समध्ये 
दरवर्षी ध्वजवंदन म्हटले की पोलिस मुख्यालय मैदानावर पोलिसांचे संचलन, विद्यार्थ्यांचा उत्साह, अधिकारी व नेत्यांची लगबग असायची. यंदा असा कोणताही प्रकार स्वातंत्र्यदिनी दिसणार नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने यंदाच्या स्वातंत्र्यदिनाचा ध्वजवंदन कार्यक्रम सोशल डिस्टन्समध्ये घेण्याचे नियोजन आखले आहे.

ध्वजवंदन, पालकमंत्र्यांचे भाषण, कोरोना संदर्भातील काही प्रातिनिधिक सत्कार, एवढेच कार्यक्रम सोशल डिस्टन्सचे पालन करून मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत होतील. त्याचप्रमाणे प्रत्येक शाळा, महाविद्यालय, भुईकोट किल्ला, शासकीय कार्यालयांतही सोशल डिस्टन्सचे पालन करून ध्वजवंदनाचे कार्यक्रम होणार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swami Samarth: स्वामी समर्थ महाराज स्वत: आशीर्वाद देताना... AI VIDEO व्हायरल, दर्शन चुकवू नका

आजचे राशिभविष्य - 18 सप्टेंबर 2025

सोलापुरात नवरात्रोत्सवही डीजेमुक्तच होणार! मध्यवर्ती मंडळांच्या एकाही पदाधिकाऱ्यांकडून ‘डीजे’ची नाही मागणी; पोलिस आयुक्त म्हणाले, साऊंड स्पीकरला परवानगी, पण...

अग्रलेख : चालढकल पुरे

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT