crime esakal
अहिल्यानगर

बेलवंडी फाट्याला गोळीबार; पारनेर पतसंस्थेचे 5 लाख लुटले

मार्तंड बुचडे

पारनेर (जि.अहमदनगर) : नगर-पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथे असलेल्या पारनेर ग्रामीण पतसंस्थेच्या शाखेच्या शाखा व्यवस्थापक बाळासाहेब सोनवणे यांच्यावर गोळीबार करत अज्ञात दरोडेखोराने सुमारे ५ लाख रुपयांची रोकड लांबवली. नगर-पुणे महामार्गावर अतिशय वर्दळीच्या ठिकाणी भरदिवसा ही घटना घडली आहे.

नगर-पुणे महामार्गावर भरदिवसा ही घटना

आज (ता.7) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. हल्लेखोरास विरोध केल्यामुळे शाखाधिकारी सोनवणे यांच्यावर लुटारूनी गोळीबार केला . यात सोनवणे यांचा छातीत गोळी लगके असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पारनेर ग्रामीण पतसंस्था ही जिल्हा परिषदेच्या कृषी व बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दाते यांनी स्थापन केली असून ते या संस्थेचे अध्यक्ष आहेत. या पतसंस्थेची नगर-पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथे शाखा आहे. आज (ता.७) दुपारी शाखा व्यवस्थापक सोनवणे हे अडीच वाजेच्या सुमारास शाखेबाहेर गेले असता दरोडेखोराने शाखेत प्रवेश केला. येथे रोखपाल म्हणून असलेल्या महिलेवर रिव्हॉल्व्हर रोखून तिच्या जवळील सुमारे पाच लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन बाहेर पडत असतानाच शाखाधिकारी सोनवणे शाखेत आले. त्यांनी दरोडेखोरास झाडूने मारहाण करत विरोध केला असताना दरोडेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला. यात सोनवणे यांच्या छातीला गोळी लागली असून त्यांना शिरूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासणी सुरू केली आहे. दरम्यान दरोडेखोर हा एकच होता असे प्रथम दर्शनी दिसत असले तरी दरोडेखोर महामार्गावरून वाहनाचा आसरा घेऊन पळून गेला असावा अशी माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये सत्तासंघर्षाला नवं वळण! व्हीप न मानल्यास अपात्रतेची कारवाई, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपचा इशारा

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

Latest Marathi News Live Update : परभणीत ५ एकरातला ऊस जळून खाक

Uddahv Thackeray : ‘भाजपकडून राज्यात भ्रष्टाचाराचे प्रदूषण’

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० बिलियन डॉलर्सची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

SCROLL FOR NEXT