Five Rohitras in Wambori Gaothan boundary have been overloaded 
अहिल्यानगर

वांबोरीत शंभर अश्‍वशक्तीच्या नव्या पाच रोहित्रांची मागणी

विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर) : घरगुती, व्यापारी व औद्योगिक ग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या, वांबोरी गावठाण हद्दीतील पाच रोहित्रांवर क्षमतेपेक्षा जास्त भार झाला आहे. त्यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे.
 
या पार्श्‍वभूमीवर, सुरळीत वीजपुरवठ्यासाठी शंभर अश्वशक्तीची नवी पाच रोहित्रे मिळावीत, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे करण्यात आली. त्यावर, महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन रोहित्रे देण्याचे आश्वासन तनपुरे यांनी दिले.
 
भिटे म्हणाले, मुळा-प्रवरा वीज संस्था अस्तित्वात असताना वांबोरी शहरासाठी अर्चना, रामदेवबाबा, पारख, बाजारतळ व देहरे वेस या ठिकाणी रोहित्रे बसविण्यात आली. त्यांवर घरगुती, व्यापारी, औद्योगिक, शासकीय कार्यालये, पथदिवे असे 1775 वीजजोड आहेत. विजेचा वापर व ग्राहकांची संख्या वाढल्याने रोहित्रांची क्षमता आता अपुरी पडत आहे. 

प्रत्येक रोहित्रावर क्षमतेच्या दीडपट विद्युतभार असल्याने, वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. १०० अश्वशक्तीची नवी पाच रोहित्रे मिळाली, तर वीजपुरवठा सुरळीत होईल. निवेदनावर भिटे यांच्यासह संकेत पाटील, पांडुरंग मोरे, विकास दगलवाज, लक्ष्मण कुसळकर, रवींद्र पटारे, सचिन पटारे, सचिन साळुंके, पिराजी धनवडे, उमेश कुसमुडे, देविदास दळवी, सचिन गायकवाड यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT