Shirdi International Airport Sakal
अहिल्यानगर

शिर्डीत विमानसेवा पुन्हा सुरळीत; लवकरच ३२ विमानफेऱ्या होणार सुरू

अरुण गव्हाणे

पोहेगाव (जि. अहमदनगर) : काकडी येथील शिर्डी विमानतळावर गुरुवारी येणाऱ्या व जाणाऱ्या प्रत्येकी चार, अशा आठ विमानांच्या फेऱ्या शिर्डी विमानतळावरून गुरुवारी झाल्या. भविष्यात या विमानतळावरुन ३२ विमानफेऱ्यांचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती ट्विटरद्वारे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष दीपक कपूर यांनी दिली.

तीन दिवसांपूर्वी दृश्‍यमानतेच्या कारणाने येथील काही विमाने इतर विमानतळांवर उतरविली तर काही उड्डाणे रद्द झाली होती. तीन दिवस दृश्‍यमानतेची अडचण निर्माण झाली होती. मंगळवारपासून येथील विमानसेवा पुन्हा सुरू झाली आहे. गेल्या अठरा महिन्यांपासून बंद असलेली विमानसेवा १० ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. त्यात मध्येच दृश्‍यमानतेची अडचण आली. साईभक्तांची मोठी पसंती सध्या मिळत असल्याने या विमानतळावर प्रवाशांची चांगली गर्दी होत आहे. गुरुवारी दिल्ली, बंगळुरू, चेन्नई व हैदराबादहून विमाने आली व परत गेली. मागे लॉकडाउनमुळे विमानतळ बंद होण्याच्या अगोदर या विमानतळावरुन १४ विमाने येत-जात होती. आता त्यात वाढ करण्याचा मानस विमानतळ विकास प्राधिकरणाचा आहे. फेऱ्या २८ वरून ३२ पर्यंत नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

अद्ययावत सुविधेची गरज

या ठिकाणी प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळतो. मात्र, दृश्‍यमानतेसह इतर अडचणी नेहमीच डोके वर काढत असतात. त्यासाठी अद्ययावत सुविधा व यंत्रणेची या ठिकाणी कमतरता आहे. त्यासाठी नवीन व अद्ययावत यंत्रणा बसविणे आवश्यक आहे.

शिर्डी विमानतळावरून विमानसेवा वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे साईभक्तांची चांगली सोय होईल, तसेच काकडीतील प्रकल्पग्रस्तांना रोजगारही उपलब्ध होईल.
- पूर्वा गुंजाळ, सरपंच काकडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT