सुनील गर्जे  
अहिल्यानगर

मराठीतून विजबील द्या, पीठ गिरणी चालकांचे घोडेगाव येथे धरणे आंदोलन

सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : राज्यातील पिठ व मसाला गिरणी चालकांना मराठीतून विज बिल द्या,  वापरलेल्या युनिटपेक्षा स्थिर आकार, इंधन आकार, अधिभार, असे आवास्तव विज बिल देण्यात येवू नये, यासह विविध मागण्यांसाठी पीठ गिरणी चालकांनी घोडेगाव (ता. नेवासे) वीज वितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

घोडेगांव येथील विज वितरण कंपणी कार्यालयाच्या प्रांगणात निरंतर सेवा पिठ गिरणी कामगार महासंघाचे राज्य प्रमुख प्रभाकर बागूल, सचिव अशोक सोनवणे, जिल्हाध्यक्ष अंबादास फटांगरे यांच्या नेतृत्वाखाली पीठ व मसाला गिरणी चालकांनी धरणे आंदोलन करत वीज वितरणचे घोडेगाव उपविभागाचे उपअभियंता भाऊसाहेब बडे व नेवासे विभागाचे उपअभियंता शरद चेचर यांना निवेदन दिले.

निवेदनात विज वितरण कंपणीने पिठ गिरणी चालकांना मराठीतून विज बिल देण्याची मागणी करत इतर आकार गिरणी चालकांवर लादू नये, पिठ गिरणी चालकांनाही औद्योगिक वीज बिलानूसार आकारणी केली जाते. तर विद्यूत पुरवठाही २४ तास द्यावा.  घरोघरी (मिनी गिरणी) चालक दळून देण्याचा धंदा करत असतील तर त्यांनाही व्यावसायिक दराने विज बिल आकारणी करण्यात यावी. या मागण्या करत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत विज बिल भरणा करणार नसल्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे 

आंदोलनात गोकूळ लोंढे, बाबासाहेब भूजबळ, रवि बोरुडे, रामनाथ दराडे, शिवाजी जाधव, लक्ष्मण पवार, बाळासाहेब वमन, रामभाऊ बोरुडे, अमोल दराडे आदी सहभागी होते.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: कर्जदारांना मोठा धक्का? ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता; EMI किती वाढणार?

Petrol Pump Facilities: पेट्रोल पंपांवरील ‘हवाच गुल’, भरणार कुठे?हवेचे यंत्र बंद, शौचालयांना कुलूप; वाहनधारकांना पिण्याचे पाणीही मिळेना

CM विजय यांनी नवजात बाळांना दिली सोन्याची अंगठी; भाजपने टीका करत म्हटलं, मुलांना दुधाची जास्त गरज

Thane News: ठाण्यात शिंदेंच्या कार्यकर्त्याला महिलांनी धु-धू धुतला, पोलिसांसमोर घडला प्रकार; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : पोलिसांसोबत कर्तव्य बजावणारे ९०० होमगार्ड मानधनाविना

SCROLL FOR NEXT