Wildlife Enumeration sakal
अहिल्यानगर

Wildlife Enumeration : वन्य प्राणी गणनेसाठी वन विभाग सज्ज

वन विभागाच्या वतीने वैशाख पौर्णिमेला वन्य प्राण्यांची गणना केली जाते. या गणनेसाठी वन विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील अभयारण्यासह वन विभागाच्या ठिकाणी ही प्राणी गणना केली जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : वन विभागाच्या वतीने वैशाख पौर्णिमेला वन्य प्राण्यांची गणना केली जाते. या गणनेसाठी वन विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील अभयारण्यासह वन विभागाच्या ठिकाणी ही प्राणी गणना केली जाणार आहे.

वन विभागाच्या वतीने दरवर्षी वैशाख पौर्णिमेला वन प्राण्यांची गणना केली जाते. प्रमुख पाणवठ्याच्या ठिकाणी वन विभागाच्या वतीने उंच ठिकाणी झाडांच्या बांध्यावर किंवा टेकडीवर झाडांच्या फांद्यांच्या सहाय्याने अडोसा निर्माण केला जातो.

त्यामध्ये वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच काही पर्यावरण मित्र स्वयंसेवक म्हणून थांबतात. वैशाख पोर्णिमेला दिवसा आणि रात्री किती वन्य प्राणी पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी आले. त्याची गणना केली जाते. वन्य प्राण्यांच्या वेगवेगळ्या वर्गवारीतील किती प्राणी आले. त्यांची गणना केली जाते.

वन विभागाकडे आतापर्यंत दिडशे पर्यावरण प्रेमी नागरिकांनी वन्य प्राणी गणनेत सहभागी होण्यासाठी स्वयंसेवक म्हणून अर्ज सादर केले आहेत. या अर्जाची छाननी केली जाणार आहे. पर्यावरण क्षेत्रामध्ये केलेल्या कामाचा अनुभव लक्षात घेतला जाईल. त्यांना यामध्ये सहभागी करून घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

-तुषार चव्हाण, उपवनसंरक्षक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT