Former Minister Ram Shinde's father dies 
अहिल्यानगर

दुःखद बातमी ः माजी मंत्री राम शिंदे यांच्या वडिलांचे निधन

सकाळ वृत्तसेवा

नगर ः माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या कुटुंबात दुःखद घटना घडली आहे. त्यांचे आधारवड वडील शंकरराव बापू शिंदे यांचे निधन झाले. त्यांच्यावर नगर येथे एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, चार मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

त्यांच्या निधनाची माहिती समजताच कर्जत-जामखेड जिल्ह्यात शोककळा पसरली. काही कार्यकर्ते नगरच्या दिशेने आले तर काहींनी त्यांचे निवास्थान चौंडी गाठले. अंत्यविधी कधी, कुठे आहे याची विचारपूस करीत होते. 

राम शिंदे यांनी आपली कारकीर्द शिक्षण क्षेत्रातून सुरू केली. त्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. ते गावचे सरपंच झाले. सभापती झाले, आमदारकी मिळाली, नंतर मंत्रीही झाले. परंतु त्यांनी आपल्या वाटचालीत नेहमीच वडिलांचे योगदान असल्याचे मान्य केले. मंत्री झाल्यानंतरही मी सालकऱ्याचा मुलगा असल्याचे ते अभिमानाने सांगत.

शंकर बापू शिंदे यांचे पूर्वायुष्य कष्टात गेले. मुलगा मंत्री झाल्यानंतरही त्यांचे पाय जमिनीवरच राहिले. कालच राज्याच्या भाजप कार्यकारिणीत माजी मंत्री शिंदे यांना उपाध्यक्षपद मिळाले होते. 

शंकर बापू शिंदे यांच्या पार्थिवावर चौंडी (ता. जामखेड,नगर) येथे उद्या सकाळी आठ वाजता अंत्यसंस्कार होणार असल्याचे शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Ayodhya Ram Temple security upgrade: राम मंदिरासह महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला बळ; महिला स्नायपर्स, PAC बटालियन आणि गनर्ससाठी अत्याधुनिक शस्त्रसाठा मंजूर

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

SCROLL FOR NEXT