अहिल्यानगर

माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचं निधन, कोपरगावात अखेरचा श्वास

ओमकार वाबळे

माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचं कोपरगावात त्यांच्य राहत्या घरी निधन झालंय. मागील वर्षी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. २१ व्या वर्षी सरपंच म्हणून राजकारणाला सुरुवात केलेल्या कोल्हे यांनी ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

कोपरगाव तालुक्यात सहकारी आणि शिक्षण संस्थांचं जाळं निर्माण करण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. (Former Minister Shankar Kolhe Died in Kopargaon)

कोपरगाव येथील माजी मंत्री शंकरराव कोल्हे (वय ९४) वर्ष यांचे आज दिनांक १६ मार्च रोजी पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ४:३० वाजता संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज येथे होणार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होतीय.

माजी मंत्री शंकरराव कोल्हे हे संजीवनी कारखान्याचे चेअरमन बिपीन कोल्हे यांचे वडील तर माजी आ.स्नेहलता कोल्हे यांचे सासरे व युवा नेते विवेक कोल्हे यांचे आजोबा आहेत. गोदावरी (खोरे) सहकारी दूध संस्था, यशवंत पोल्ट्री, देवयानी सहकारी बँक लि. कोपरगाव उभारण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेड अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

चोरीचे दागिने घेणारा सराफही आरोपी! पावतीशिवाय दागिने घेतल्यास पोलिसांकडून कारवाई; ‘या’ कलमाखाली 3 वर्षांपर्यंत कारावास अन्‌ दंडाची शिक्षा, वाचा...

जिल्हा परिषदेच्या भन्नाट योजना! महिलांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी; सातवी ते बारावीतील मुलींना सायकली, टॅली, MS-CIT, कराटे प्रशिक्षण, गरीब मुलांना पैसेही

Best Banana French Toast: बिझी मॉर्निंगसाठी बेस्ट! 10 मिनिटांत बनवा बनाना फ्रेंच टोस्ट; लिहून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT