Former MLA Shivaji Kardile's criticism of Shashikant Gade 
अहिल्यानगर

माजी आमदार शिवाजी कर्डिलेंना पुन्हा व्याह्याचा टोमणा

दत्ता इंगळे

नगर तालुका ः शिवाजी कर्डिले आता माजी आमदार झाल्याने, त्यांचे नगर तालुक्‍यात काहीच अस्तित्व राहिलेले नाही, असा टोला नगर तालुका महाविकास आघाडीचे नेते, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी लगावला. 

नगर तालुक्‍यातील 59 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, त्या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीतर्फे आयोजित मेळाव्यात गाडे बोलत होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हाध्यक्ष आशा निंबाळकर, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उद्धव दुसुंगे, कॉंग्रेसचे संपत म्हस्के, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, गोविंद मोकाटे, इंजिनिअर प्रवीण कोकाटे, उपसभापती रवींद्र भापकर, रोहिदास कर्डिले आदी उपस्थित होते. 

संदेश कार्ले म्हणाले, की ग्रामपंचायतीनंतर सेवा सोसायट्या, बाजार समिती व जिल्हा बॅंकेची निवडणूक होत आहे. बाजार समितीच्या गत निवडणुकीत महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांना चांगलाच घाम फोडला होता.

महाविकास आघाडीची संधी थोडक्‍यात हुकली. मात्र, आता ते माजी आमदार झाल्याने, तालुक्‍यातील जनता त्यांना स्वीकारणार नाही. जिल्हा बॅंक व बाजार समिती जिंकण्यासाठी ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकावा लागेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुढील चार दिवस पाऊस, गणपती काळात कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडणार घ्या जाणून

घटस्फोटाच्या ११ वर्षानंतर पुन्हा लग्न करायला तयार आहे तेजश्री प्रधान; अखेर मनातलं सांगितलंच, म्हणते-

US Midterm Elections: अमेरिकेतही ‘लाडकी’ योजना; मध्यावधीसाठी पाच हजार डॉलर देण्याचे ट्रम्प यांचे आश्वासन

Latest Marathi News Live Update : पुण्यात एफडीएची मोठी कारवाई, शेकडो किलो पनीर जप्त

नवी मुंबई विमानतळावरून तिकीटदर कमी होणार? लँडिंग शुल्कात १०० टक्के सवलत, प्रशासनाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT