अकोले (नगर) : भंडारदरा व मुळा पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असून या भागातील शेतकरी अडचणीत असून त्यांची शेती उध्वस्त झाली आहे. अशावेळी ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने या शेतकऱ्यांच्या हाताला रोजगार मिळावा. तसेच पर्यटन बंद असल्याने खावटी, शालेय पोषण आहार व मुलांना टॅब द्यावेत व शेतीच्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी सरकारने पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी माजी आमदार वैभव पिचड यांनी रतनवाडी, साम्रद, पांजरे, उद्धवने, घाटघर, मुतखेल, कुमशेत या भागाचा दौरा करताना केली आहे.
भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पाऊस, धुके, गारवा त्यात घाटघरला ५,११८ मिलीमीटर पाऊसाची नोंद भातपिके नष्ट झाली अशा परिस्थिती आदिवासी माणसे, जनावरे गारठून गेली आहेत. शेतीचे नुकसान झाले आहे. तरी स्थानिक सरपंच आपल्या परीने गावात कोरोना येऊ नये, म्हणून दक्षता घेतात. त्यांचे व आदिवासीचे मनोबल वाढावे, म्हणून माजी आमदार वैभव पिचड यांनी या परिसराला भेट दिली. जाताना बरोबर सभापती, उपसभापती व स्व. जितेंद्र पिचड सेवाभावी संस्थेचे सामाजिक कार्यकर्त्यांची टीम व शारीरिक क्षमता वाढावी, शरीरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून अर्सेनिक अल्बम ३०च्या गोळ्या व कोरोना योध्याचे सर्टिफिकेट माजी आमदार वैभव पिचड यांच्या हस्ते देण्यात आले.
कोरोना प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून स्थानिक कोरोना समितीने प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले त्यांना 'कोरोना योद्धा' म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी आदिवासींशी सवांद साधताना आश्रमशालेचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या खावटी प्रश्न, फुटातुटीचे प्रश्न समजून घेतले. तसेच कोविड १९ बाबत मार्गदर्शन करून गोळ्यांचे वाटप केले. तर शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेयपोषण आहार मिळावा, संबंधितांनी हलगर्जीपणा करू नये, अशा सूचना केल्या.
यावेळी सभापती उर्मिला राऊत व उपसभापती दत्तात्रय देशमुख यांनी आरोग्य विभागाला सूचना केल्या ग्रामसेवकांना स्थानिक ठिकाणी राहण्याचे आदेश दिले. यावेळी धोंडिबा सोंगाळ, भारत घाणे, मारुती बांडे, संपत झडे, जयराम इडे, दीपक देशमुख, निलेश साकुरे, विजय भांगरे, पांडुरंग खाडे, गणपत खाडे, तुकाराम खाडे, रमेश खडके, प्रकाश खडके, अनिल भालेराव, देविदास शेलार व ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .
संपादन - अशोक मुरुमकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.