Former MP Prasad Tanpure has said that modern fast and courteous services should be provided to the customers along with the credit unions 
अहिल्यानगर

पतसंस्थांच्या बरोबरीने ग्राहकांना आधुनिक जलद सेवा द्याव्यात

सकाळ वृत्तसेवा

राहुरी (अहमदनगर) : नगर जिल्हा सहकारी बँकेच्या ग्रामीण भागातील शाखा भाडोत्री खोल्यांमध्ये आहेत. तेथे बँकेने स्वमालकीच्या इमारतीत बांधाव्यात. पतसंस्थांच्या बरोबरीने ग्राहकांना आधुनिक, जलद व विनम्र सेवा द्याव्यात. बँकेचे अध्यक्ष उदय शेळके बँकिंग क्षेत्रातील तज्ञ आहेत. त्यांच्या कार्यकाळात बँकेत कायापालट होईल, असा विश्वास असल्याचे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी सांगितले.

सोमवारी राहुरी येथे जिल्हा बँकेच्या नुतनीकरण केलेल्या मुख्य शाखेच्या उद्घाटनावेळी तनपुरे बोलत होते. बँकेचे संचालक अरुण तनपुरे, सुरेश वाबळे, बजरंग तनपुरे, सुरेश बाफना, शिवाजी डौले, रमेश सुराणा, गंगाधर जाधव, बँकेचे टीडीओ मच्छिंद्र तनपुरे, शाखाधिकारी किरण मदगे उपस्थित होते.

तनपुरे म्हणाले, राहुरी शाखेत साठ लाख रुपये खर्च करून अद्ययावत फर्निचर व संरक्षक भिंतीचे काम केले आहे. आठ महिने काम चालले. काही काम अद्याप अपूर्ण आहे. बँकेकडे मुबलक इमारत निधी आहे. ग्रामीण भागातील शाखांचे कामकाज छोट्याशा भाडोत्री खोल्यांमध्ये चालते. अशा शाखांच्या स्वमालकीच्या इमारती बांधून, आधुनिक सेवा सुविधा पुरविणे गरजेचे आहे. पतसंस्थांच्या तुलनेत जिल्हा बँकेच्या सुविधा अपुऱ्या ठरत आहेत. बँकेचे विद्यमान अध्यक्ष शेळके यांच्या कार्यकाळात बँकिंग सेवेत अमुलाग्र बदल होईल, याचा विश्वास आहे, असेही तनपुरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Sushila Karki Government : नेपाळच्या सुशीला कार्की सरकारचा मोठा निर्णय! आंदोलनात जीव गमावलेल्या ‘Gen-Z’ ना शहीद दर्जा!

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर भारताच्या सायलंट किलरला मिळालं 'इम्पॅक्ट प्लेअर' मेडल; पाहा ड्रेसिंग रुममधील Video

Pratap Sarnaik : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी, टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Priyank Kharge statement : प्रियांक खर्गेंंचं हिंदू धर्माबाबत मोठं विधान! ; निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला पडणार महागात?

Latest Marathi News Updates : एससी आरक्षण बदलल्याचा खोटा प्रचारः राहुल डंबाळे

SCROLL FOR NEXT