Four arrested for kidnapping girl from Dive Ghat 
अहिल्यानगर

दिवे घाटातून मुलीला पळवणाऱ्या चौघांना अटक

राजेंद्र सावंत

पाथर्डी: पुणे जिल्ह्यातून दिवे घाटातून दुचाकीवर भावासोबत जाताना कोयत्याचा धाक दाखवून चौघांनी मुलीचे अपहरण केले. तिला तिसगावला आणले, तेथे पुणे पोलिसांना आरोपींनी हुलकावणी दिली. मात्र, पाथर्डी पोलिसांनी मुलीसह तिला पळविणाऱ्या चौघांना ताब्यात घेत लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले. 

दिवे घाटातून 3 ऑक्‍टोबर रोजी सकाळी दुचाकीवर चुलतभावासह मुलगी जात होती. कार व दुचाकीवर आलेल्या चौघांनी त्यांना अडवून कोयत्याचा धाक दाखवित मुलीला कारमधून पळवून नेले. याबाबत लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

आरोपी मुलाचा मामा तिसगाव येथे राहतो. मुलीसह आरोपी तिसगाव येथे आल्याचे पोलिसांना समजले. पुणे ग्रामीणचे पोलिस येथे आले असता, चौघांनी त्यांना हुलकावणी दिली. 

तिसगाव शिवारात रविवारी (ता.4) कर्तव्यावर असणाऱ्या पोलिस कर्मचारी आप्पासाहेब वैद्य यांना खबऱ्याकडून या आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तिसगाव येथील बाजार समिती परिसरात आरोपी राहुल मेहेत्रे (रा. निलंगा, लातुर), अविनाश चौघुले (रा. दौंड) व अमजाद पठाण यांना पकडले.

त्यांच्या माहितीवरुन आरोपी अनिस पठाण व मुलीला तिसगाव येथून ताब्यात घेतले. त्यांना लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Cabinet: महावितरणचे विभाजन होणार; देशातील पहिले AI आयुक्तालय महाराष्ट्रात बांधणार, महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Amazon Layoffs : मे महिन्यात 14,000 कर्मचाऱ्यांची कपात! 3 महिन्यांत पुन्हा नोकरकपात; AI मुळे नोकऱ्यांवर संकट?

Latest Marathi News Live Update: MPSC चा निकाल जाहीर, सोलापूरचा विजय राज्यात पहिला

निर्मिती सावंत आता होणार ‘भागूबाई’! सगळ्या गावाची खबर ठेवणाऱ्या व्यक्तिरेखेचा धमाकेदार पोस्टर रिलीज.

Sunetra Pawar Devendra Fadnavis Meeting : सुनेत्रा पवार, पार्थ पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; बारामती पोटनिवडणुकीत भाजपची यंत्रणा सक्रीय

SCROLL FOR NEXT