accident. news 
अहिल्यानगर

अरेरे... दुख:द घटना शेततळ्यात बुडून सख्या भावंडाचा झाला मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे (बाबूर्डी ): येथे गुऱ्हाळवर काम करणाऱ्या उत्तर प्रदेश येथील मजुरांची चार मुले शेततळ्यातील पाण्यात बुडाली. त्यामुळे त्या चारही मुलांचा जागीच मृत्यू झाला. बाबूर्डी तालुक्यात दुर्दैवी घटना घडली. मृत्युमुखी झालेली चारही मुले सख्खे भाऊ होते. घटनास्थळी जावून पोलिसांनी पंचनामा केला. महंमद अरबाज (वय २१), महंमद फैजल (वय २०), महंमद दानीश ( वय १३) व महंमद नवाजीस (वय ९) अशी पाण्यात बुडून मरण पावलेल्या मुलांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबूर्डी येथील एका गुऱ्हाळवर काम करण्यासाठी उत्तरप्रदेश येथील परप्रांतीय मजूर कामाला आहेत. हे मजूर रात्रीचे काम करीत असल्याने दिवसा झोपलेले असतात. त्यावेळी ही चारही भावंडे जवळ असलेल्या शेततळ्याकडे गेली. त्याचारही भावंडाचे दुर्दैव असे की, त्या शेततळ्याचे मालक दत्तात्रय शिर्के त्यावेळी तेथे नव्हते. ही मुले शेततळ्यात उतरल्यावर पुन्हा त्यांना पाण्यतून वर येता आले नसावे. एक जण पाण्यात पडल्यानंतर इतर एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात शेततळ्याच्या पाण्यात पडून बुडाली असावीत असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे यांच्या भेटीला अभिजीत दिपके, सरकारवर हल्लाबोल

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT