The four who beat up an ST driver in Ahmednagar will be punished 
अहिल्यानगर

एसटी चालकाला मारहाण करणाऱ्या चौघांना शिक्षा

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : एसटी चालकाला मारहाण केल्याबद्दल चौघांना एक वर्ष सक्‍तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी पाचशे रुपये दंड; दंड न भरल्यास 15 दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एन. राव यांनी ठोठावली.
 
शरद भोर, संदीप लांडगे (दोघे रा. केडगाव, ता. नगर), दादा पवार व पोपट भोगाडे (दोघे रा. साकत, ता. आष्टी) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. चालक बबन राजाराम बुधवंत 23 मार्च 2013 रोजी रात्री एक वाजता एसटी बस (एमएच 14 बीटी 582) सोलापूरला घेऊन जात होते. नगर-सोलापूर महामार्गावरील "टोल' नाक्‍याजवळ कारचालकाने (एमएच 12 सीडी 2329) बसला थांबण्याचा इशारा केला. चालक बुधवंत यांनी बस थांबविली नाही. त्यानंतर कारचालकाने अर्धा किमीवर एसटी बसला ओव्हरटेक केले. कार बससमोर उभी केली. कारमधून पाच जण उतरले आणि चालक बुधवंत यांना, 'कारला बस घासली' असे म्हणून शिवीगाळ करीत दरवाजातून खाली ओढू लागले. बुधवंत यांनी स्टिअरिंग धरल्यामुळे चार व्यक्‍ती बसच्या केबिनमध्ये घुसल्या. त्यांनी लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. टॉमीने उजव्या हातास दुखापत केली.
 
बुधवंत यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. नगर तालुका पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपी शरद अशोक भोर (रा. जिल्हा परिषद शाळेमागे, केडगाव), संदीप तान्हाजी लांडगे (रा. कांबळे मळा, केडगाव), दादा गोरख पवार व पोपट भाऊसाहेब भोगाडे (रा. साकत, ता. आष्टी, जि. बीड) यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले. या खटल्यात सरकारतर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, वैद्यकीय पुरावा, तपासी अधिकारी आणि परिस्थितिजन्य पुरावे महत्त्वपूर्ण ठरले. चौघांविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने सर्वांना एक वर्ष सक्‍तमजुरी आणि प्रत्येकी पाचशे रुपये दंड; दंड न भरल्यास 15 दिवस साध्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली. ऍड. एस. जी. पाटील यांनी सरकारतर्फे काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Dhas: ''माझा मुलगा सुपारीसुद्धा खात नाही'', 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'च्या आरोपावर सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

एक नायक तर दुसरी खलनायिका; टीव्हीचे गाजलेले चेहरे पुन्हा भेटीला येणार; कोण आहेत ते? प्रेक्षकांनी सांगितली नावं

Jalgaon News : खेळता खेळता हरवला जीव! जळगावात १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Electricity Supply: अदानी हटाव..., प्रीपेड मीटरला ग्राहकांचा नकार; महावितरण खाजगीकरणाविरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

Pune Market Committee : संचालक मंडळ बरखास्त करून ईडी व इन्कम टॅक्स चौकशी करा; राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष विकास लवांडे यांची मागणी

SCROLL FOR NEXT