Annie Desk app fraud sakal
अहिल्यानगर

‘एनी डेस्क ॲप’मुळे गेलेली रक्कम ‘सायबर’मुळे परत

खात्यातून गेलेल्या एक लाख ९८ हजारांपैकी ९० हजार रुपये परत मिळविण्यात सायबर पोलिसांना यश

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : एनी डेस्क ॲप डाऊनलोड करून त्यावर बॅंक खात्याची माहिती भरल्याने खात्यातून गेलेल्या एक लाख ९८ हजारांपैकी ९० हजार रुपये परत मिळविण्यात सायबर पोलिसांना यश आले.

केडगाव येथील व्यक्तीने फसवणूक झाल्यानंतर तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यामुळे हे शक्‍य झाल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले. केडगाव येथील रहिवासी मारुती दशरथ राजापुरे यांचीही, एनी डेस्क ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून त्याचा ॲक्‍सेस दुसऱ्याला दिल्यानंतर फसवणूक झाली होती. या माहितीच्या आधारे राजापुरे यांच्या बॅंक खात्यामधून एक लाख ९८ हजार रुपये काढून घेतले होते.

आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच, त्यांनी दीड ते दोन तासांमध्ये सायबर पोलिसांकडे संपर्क साधला. तक्रार दिल्यानंतर पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले आणि उपनिरीक्षक प्रतीक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार योगेश गोसावी, उमेश खेडकर, अभिजित आरकल, राहुल गुंडू, दिगंबर कारखिले, मलिक्कार्जुन बनकर, राहुल हुसळे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करीत राजापुरे यांच्या खात्यातून गेलेले ९० हजार रुपये परत मिळून दिले. सायबर ब्रँचमुळे आतापर्यंत लाखो रुपये परत मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT