Fraud by the lure of giving flat 
अहिल्यानगर

प्लॅट देण्याच्या आमिषाने फसवणूक, तिघांविरूद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

नगर ः शहरातील सारसनगरमधील प्रकल्पात फ्लॅट देण्याच्या आमिषाने बांधकाम पर्यवेक्षकास चार वर्षे विनामोबदला राबवून घेतले. नंतर घरातील सजावटीसाठी त्यांच्याकडून 9 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी भिंगार पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

लक्ष्मण निवृत्ती जाधव (रा. जाधववाडी, अकोळनेर, ता. नगर), केशव रामदास सूर्यवंशी (रा. उत्तमनगर, पुणे) व सोहम रिऍलिटी ऍड केशर डेव्हलपर्स यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. याबाबत विनय वासुदेव सेहगल (रा. वैद्य कॉलनी, जामखेड रस्ता) यांनी न्यायालयात खासगी फिर्याद दिली आहे. त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला. 

शहराजवळील सारसनगरमधील कानडे मळ्यात सोहम रिऍलिटी अँड केशर डेव्हलपर्स फर्मच्या नावाखाली कृष्णाई रेसिडेन्सी जॉइंट व्हेंचरमध्ये 125 फ्लॅटचा प्रकल्प करण्यात येत होता. त्यातील "सी' विंगमधील फ्लॅट क्रमांक 301 हा सेहगल यांना देण्याचे आमिष आरोपींनी दाखविले. त्यासाठी प्रकल्पाला लागणारी शासकीय परवानगी, कामावर देखरेखीसाठी 2013पासून त्यांना राबवून घेतले. नंतर फ्लॅटमधील सजावटीसाठी 10 जून 2016 रोजी 9 लाख रुपये घेतले. त्यानंतर प्रोजेक्‍ट रद्द झाल्याचे सांगितले. विनय सेहगल यांनी पैसे मागितले असता आरोपींनी त्यांना धमकावले, असे फिर्यादीत म्हटले आहे. सेहगल यांच्यातर्फे ऍड. राहुल गायकवाड, ऍड. मंदार पळसकर यांनी काम पाहिले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy: तिलक वर्मा ९९ धावांवर आऊट अन् मग वैभव सूर्यवंशी, ईशान किशनसह पूर्व विभागानं जे केलं, त्यानं जिंकली कोट्यवधींची मनं!; Video

CSMT Redevelopment : सीएसएमटीचा ‘वर्ल्ड हेरिटेज’ दर्जा; पुनर्विकासाने मात्र रेल्वेचीच कोंडी! प्लॅटफॉर्म १६-१७ सात महिन्यांपासून बंद, आता १४-१५ ताब्यात देण्याची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय यांचा पहिलाच परदेश दौरा

MLA Manoj Kayande : सिंदखेड राजा मतदारसंघांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Pune News : विद्यानंद बापट हल्ला प्रकरणातील संतोष चव्हाणचा जामीन न्यायालयाने फेटाळला

SCROLL FOR NEXT