Fraud by military uniform 
अहिल्यानगर

मिलिटरीच्या सेवेतून रजेवर आला नि डायरेक्ट चोरच झाला..

सकाळ वृत्तसेवा

नगर : 

तो भारतीय सैन्यात होता. रजा काढून घरी आला नि इथेच रमला. सुट्टीच्या काळात तो वेगळ्या उद्योगात गुंतला. तो उद्योग म्हणजे चोरीचा, लोकांना फसवणुकीचा. अहमदनगर शहरासह राज्यात त्याचा हा धंदा सुरू होता. मात्र, त्याचा हा गोरखधंदा उघडकीस आला.

कर्मचाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखा व मिलिटरी इंटेलिजन्स पथकाने नगर एमआयडीसी परिसरातून आज ताब्यात घेतले. प्रशांत भाऊराव पाटील (वय 32, रा. रवळनाथ रोड, कुकतागिरी, खानापूर, बेळगाव) असे त्याचे नाव आहे. 

पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांना जम्मू-काश्‍मीर येथील मिलिटरी इंटेलिजन्स पथकाकडून माहिती मिळाली, की एमआयडीसी परिसरातील दत्तनगर, डेअरी चौक, पाण्याच्या टाकीजवळ रो-हौसिंगमध्ये एक व्यक्ती सैन्य दलात नोकरीस नसतानाही सैन्य दलाचा गणवेष घालून व स्वत:च्या चारचाकी वाहनावर "ऑन आर्मी ड्यूटी' असा बोर्ड लावून संशयितरीत्या फिरत आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा लावून त्याला अटक केली. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने प्रशांत पाटील असे नाव सांगितले. 

त्याची झडती घेतली असता सैन्य दलाचे बनावट ओळखपत्र, दोन गणवेश, गणवेशावर लावण्याचे चिन्ह, फीत, गोल शिक्का, स्टॅम्प पॅड, नेम प्लेट, आर्मीचे कॅंटीन कार्ड, वडील व पत्नीच्या नावाचे डिपेन्डिंग कार्ड, पाच वेगवेगळ्या बॅंकांचे एटीएम कार्ड, पेन्शन सिस्टिम कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, आर्मीचे नोकरीसाठी वेगवेगळ्या लोकांकडून भरून घेण्यात आलेले अर्ज, पत्नीच्या नावाचे चौदा पासबुक, वेगवेगळ्या बॅंकेचे सात चेकबुक, एक चारचाकी वाहन, बनावट नंबर प्लेट, पाच मोबाईल आणि आसाम रायफल ट्रेनिंग सेंटर स्कूल यांच्याकडील मेजर ए. के. नायर यांच्या सहीचे परसराम भाऊराव पाटील या नावाचे प्रोव्हिजनल अपॉइंटमेंट लेटर, अशी बनावट कागदपत्रे व सात लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

दरम्यान, प्रशांत पाटील आसाम रायफलमध्ये नोकरीस असताना 2014 मध्ये रजेवर आल्यानंतर पुन्हा हजर झाला नाही. त्यामुळे त्यास नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले. त्यानंतर तो गणवेश व अन्य साहित्याचा वापर करून फसवणूक करीत होता.

या बाबत पोलिस कर्मचारी संदीप पवार यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संशयित आरोपीवर यापूर्वी बंडगार्डन, पुणे, वाकड येथे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS 2nd T20I Live: अभिषेक शर्मा एकटा भिडला! सूर्या, गिल, संजू फेल झाले असताना हर्षित राणा फलंदाजीत चमकला

Smart Anganwadi Kit: डिजिटल चालना; १६१ अंगणवाड्यांना स्मार्ट कि, प्रत्येकी १ लाख ६४ हजार ५६० रुपयांचा निधी, सुधारणेतील मोठा टप्पा

Latest Marathi News Live Update : सोयाबीनची नोंदणी सुरू होताच सर्वर डाऊनचा शेतकऱ्यांना फटका

'रोहित आर्यनं कालच आर.के. स्टुडिओत बोलावलं होतं' मराठी अभिनेत्रीने सांगितलं, 'त्याने मला लोकेशन सुद्धा पाठवलेलं पण...'

Undri Traffic : उंड्रीत अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी; नागरिकांची डोकेदुखी वाढली

SCROLL FOR NEXT