बी.जी. कोळसे पाटील ई सकाळ
अहिल्यानगर

आरक्षण मराठा तरूणांना खेळविण्याचा डाव

माजी न्यायमूर्ती कोळसेपाटील यांचे मत

सकाळ डिजिटल टीम

नगर ः आरक्षण हा मराठा युवकांना खेळविण्याचा "गेम' होता. मनुवाद्यांची व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) ती चाल होती. देशाचे सार्वजनिक उद्योग भांडवलदारांना विकलेले आहेत. त्यामुळे नोकऱ्या नाहीत. आरक्षणातून फक्‍त शैक्षणिक लाभ होणार होता. गुणवत्तेच्या जोरावर मराठा तरुणांनी आपले अस्तित्व दाखवून द्यावे.(Fraud of Maratha youth in the name of reservation)

आरक्षण रद्द झाल्यामुळे काहीही नुकसान झालेले नाही. आरक्षण देणारे आपणही होऊ शकतो. थोरल्या भावाची भूमिका निभवावी, अशी प्रतिक्रिया माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी दिली.

कोळसे पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अनेक संकटे आली. परंतु ते डगमगले नाहीत. त्यांचा आदर्श घेऊन आपण प्रत्येक संकटाला सामोरे गेले पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण देताना मराठे विरुद्ध मराठेतर असे गाजर दाखविण्यात आले. ज्यांनी आरक्षण दिले त्यांनीच खऱ्या अर्थाने तुम्हाला फसविले आहे.

आरक्षणाबरोबरच इतरही अनेक आव्हाने आपल्या समोर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कायदे हे विषारी मनुवादी आहेत. सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण करून युवकांच्या हाती नोकऱ्याच ठेवलेल्या नाहीत. देश विकला गेला आहे. मनुवाद्यांची, आरएसएसची चाल ओळखा, असे आवाहनही कोळसे पाटील यांनी केले आहे.(Fraud of Maratha youth in the name of reservation)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

SCROLL FOR NEXT