fraud with parent taking donation for school admission education Sakal
अहिल्यानगर

Ahmednagar School Admission : शाळांतही ॲडमिशनसाठी डोनेशन; अनुदानित संस्‍थाकडून पालकांची आर्थिक लूट

School Admission Donation : नगर जिल्हा शिक्षण क्षेत्रात आघाडीवर आहे. त्यामुळे बहुतांशी शिक्षण संस्था अनुदानपात्र आहेत. तसेच शिक्षकांचे वेतनही सरकारकडून केले जाते.

अशोक निंबाळकर

Ahmednagar News: जिल्ह्यातील बहुतांशी खासगी, तसेच अनुदानित शाळांत पालकांची आर्थिक लूट होत आहे. प्रवेशासाठी डोनेशन मागितले जाते. विशेष म्हणजे त्याची पावतीही दिली जाते. हे उघड गुपित आहे. आता तर संबंधित शाळा संस्थेच्या नावाने आरटीजीएस करायला सांगत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

नगर जिल्हा शिक्षण क्षेत्रात आघाडीवर आहे. त्यामुळे बहुतांशी शिक्षण संस्था अनुदानपात्र आहेत. तसेच शिक्षकांचे वेतनही सरकारकडून केले जाते. त्यामुळे त्या शाळांत प्रवेशासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारता येत नाही.

परंतु इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेजप्रमाणे डोनेशन देऊन ॲडमिशन मिळवले जात आहे. खासगीसोबतच अनुदानप्राप्त शाळाही हा गोरखधंदा करीत आहेत. नामांकित शाळांतील प्रवेशासाठीच किंमत मोजावी लागते.

पालकांचा त्याच शाळांत प्रवेशासाठी ओढा असतो. याच कारणाने बालवाडी, पहिलीपासूनच प्रवेशासाठी सेटिंग लावली जाते. काही ठिकाणी राजकीय नेते मंडळींची चिठ्ठी कामी येते, तर काही ठिकाणी पालकांना भरमसाट डोनेशन मोजावेच लागते. नगर शहरातील शाळांतही त्यात मागे नाहीत.

वेगवेगळी शक्कल

पालकांकडून डोनेशन घेण्यासाठी संस्थाचालकांनी वेगवेगळी शक्कल लढवली आहे. शैक्षणिक शुल्क, मदत निधी, बांधकाम निधी अशा प्रकारची गोंडस नावे दिली जातात. काही तर संस्थेच्या नावे आरटीजीएस करायला लावतात.

काही ठिकाणी तर कोणतीच लिखापढी नसते. त्यांच्याकडे रोख स्वरूपात डोनेशन स्वीकारले जाते. ॲडमिशन काळात संबंधितांचे बँक खाती तपासली, तर सर्व उद्योग समोर येईल, असे पालकांनी दैनिक सकाळशी बोलताना सांगितले.

आरटीईमुळे ससेहोलपट

आरटीई अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळेत मोफत प्रवेश दिला जातो. पहिली ते आठवीपर्यंत अशी सोय आहे. त्यानंतर गरीब पालकांना खासगी इंग्रजी शाळेत अव्वाच्या सव्वा शुल्क देऊन पाल्याला शिकवणे जमत नाही.

तो शुल्क वाचविण्यासाठी अनुदानित मराठी माध्यमाकडे वळतो. तेथेही त्याच्याकडे डोनेशनची मागणी होते. यातून संबंधित पाल्याची ससेहोलपट होते. काहींना तर शिक्षणाला मुकावे लागते. इथेही तक्रार नाही म्हणून कारवाई नाही, असे पालुपद शिक्षण विभागाकडून ऐकायला मिळते.

आडनाव पाहून प्रवेश

नावात काय आहे, असे लेखक शेक्सपिअर म्हणून गेलाय. परंतु, नावात काय नसले, तरी आडनावात बरंच काही दडलेलं आहे. त्यावरून शाळेत विनाडोनेशन प्रवेश मिळतो. शैक्षणिक शुल्कात सवलत मिळते.

नगर शहरातील काही शाळा त्यासाठी ओळखल्या जातात. अगोदर आपले, नंतर बाकीचे असा ते फंडा वापरतात. आडनावारून जात, धर्म शोधण्याचा प्रयत्न होतो. दरवर्षीच हा प्रकार होतो. पण बोलायचे कोणी...

जास्तीचे शैक्षणिक शुल्क घेतले, प्रवेशासाठी डोनेशन घेतल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहेत. त्या तक्रारींची चौकशी केली जाईल. त्यासाठी समिती नेमली जाणार आहे. ज्या शाळांमध्ये अनियमितता आढळेल, त्यांच्यावर कारवाई होईल. गैरप्रकार केल्याचे समोर आले तर थेट शाळा मान्यता रद्दचा प्रस्ताव पाठवला जाईल. या प्रकरणात कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही.

-अशोक कडूस, शिक्षणाधिकारी जि.प.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anand Paranjpe Sharad Pawar Meeting : पक्ष प्रवेश एकनाथ शिंदेंच्या पक्षात, भेट घेतली शरद पवारांची; ठाणेकर आनंद परांजपेंच्या भेटीने चर्चांणा उधाण

Pune : शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा भीषण अपघात, फॉर्च्युनरची रिक्षाला धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

'बालिका वधू'च्या गहनाने १० रुपयांच्या वस्तूपासून बनवला ब्रँड; कमावतेय कोट्यवधी, तुमच्याही घरात असेलच, काय आहे ती वस्तू?

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

SCROLL FOR NEXT