Fraud of a woman in gold at Sangamner 
अहिल्यानगर

पितळेची भांडी झाली सोन्याची, सोने बनले पितळ!

आनंद गायकवाड

संगमनेर ः घरातील तांब्या पितळेच्या भांड्यांना दिलेली चकाकी पाहून त्या ज्येष्ठ महिलेचा विश्वास त्याने संपादन केला. भांड्य़ाप्रमाणे दागिने चमकावून देण्याचे आमिष दाखवून, त्याने हातोहात सुमारे 34 हजार 500 रुपयांचे दागिने लांबवल्याची घटना, शहरातील मालदाड रोडवरील स्वामी समर्थ नगर येथे मंगळवार ( ता. 16 ) रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

याबाबत सुनीता भिकाजी नेहे ( वय 60 ) यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्या घरी एकट्या असताना, तांबे पितळेचे भांडे पॉलीश करून देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने प्रवेश केला.

भांडे एकदम चकाचक स्वच्छ केल्यानंतर स्वस्तात सोन्याच्या दागिन्यांनाही पॉलिश करण्याची भुरळ घातली. गळ्यातील एक तोळा वजनाची सोन्याची साखळी, मिनी गंठण असा ऐवज पॉलिशसाठी त्याच्या हवाली केला. त्याने बोलण्यात गुंतवून, नकळत दागिने लंपास केल्याने फसवलो गेल्याचे समजले.

या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन भामटे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Breaking News: पुण्यात झाड कोसळलं, मुलगी बचावली,घटना CCTVमध्ये कैद

State Award: अंबडच्या लालवाडीतील प्रगतशील शेतकरी गोवर्धन उगले यांना राज्यस्तरीय कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार

चंद्रपूरमध्ये वनक्षेत्राबाहेर आढळला वाघाचा मृतदेह; शिकार की नैसर्गिक मृत्यू? गूढ वाढलं...परिसरात खळबळ

Rajapur Tourism: जिथे शिवरायांनी इंग्रजांना धडा शिकवला... राजापूरची ऐतिहासिक ब्रिटिशकालीन वखार नव्या रूपात सज्ज; पर्यटनाचे नवे आकर्षण

Alandi Property Tax : आळंदीतील चतुर्थ वार्षिक करवाढीवर 748 हरकती; सुनावणीला केवळ 350 हरकतदार उपस्थित

SCROLL FOR NEXT