Free Aadhaar certification for farmers to avail of debt relief scheme 
अहिल्यानगर

कर्जमुक्ती योजनेचे "येथे' होणार मोफत आधार प्रमाणीकरण

सकाळ वृत्तसेवा

कर्जत (अहमदनगर) : महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे आधार प्रमाणीकरण अभिनव युवा प्रतिष्ठानद्वारे मोफत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष धनंजय लाढाणे यांनी केले आहे. 
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप अंतर्गत महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी आधारचे प्रमाणीकरण कर्जत तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी अभिनव युवा प्रतिष्ठानच्या वतीने मोफत करण्यात येणार आहे. येथील जय श्रीराम कॉम्प्लेक्‍समध्ये हे मोफत केंद्र आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन लाढाणे यांनी केले आहे. यावेळी लाभ घेताना शेतजमीनीचे सातबारा, 8अ उतारे, आधारकार्ड आणि बॅंकेचे पासबुक आवश्‍यक आहे. या प्रतिष्टानच्या वतीने अनेक विधायक उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्यामध्ये गरजूंना मोफत भोजन, सॅनिटायझर वाटप, जंतुनाशक फवारणी, मोफत पीठगिरणी, जातीचे मोफत दाखले वाटप, ऑनलाइन नोकरी महोत्सव, अभिनव अर्बन मल्टिपल निधी संस्थेच्या वतीने लघुउद्योग, किरकोळ विक्रेते, छोटे दुकानदार यांना दिलेले कर्ज अधिकचे व्याज न आकारत सवडीने परतफेड करण्याची मुभा आदी उपक्रम राबविण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT