Free cylinders to 2 lakh 51 thousand 277 women under Annapurna Yojana sakal
अहिल्यानगर

Free Gas Cylinder : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत २ लाख ५१ हजार २७७ महिलांना मोफत सिलिंडर

केंद्र सरकारची प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना वर्षातून तीन एलपीजीचे गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : केंद्र सरकारची प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना वर्षातून तीन एलपीजीचे गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली आहे.

जिल्ह्यात उज्ज्वला गॅस योजनेचे ३ लाख १७ हजार ५२२ लाभार्थी आहेत. यापैकी २ लाख ५१ हजार २७७ लाभार्थ्यांना एका सिलिंडरच्या अनुदानाचा लाभ मिळाला आहे. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात ११ लाख ३६ हजार ९४४ महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत.

यापैकी ६ हजार ६१६ महिलांचे अर्ज जिल्हा पुरवठा विभागाकडे पडताळणीसाठी आले आहेत. अर्जाची पडताळणी करून पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्य दिले जाणार आहे. राज्य सरकारने १ जुलैपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.

सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून लाडक्या बहिणींना वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडर देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पहिला हप्ता देण्यात आला आहे. लवकरच पात्र लाभार्थ्यांना योजनेचे अनुदान बँक खात्यावर वर्ग केले जाणार असल्याचे पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ''तुम्ही बंजारा समाजासारखे दिसत नसतानाही आरक्षण का खाल्लं?'', धनंजय मुंडेंना उद्देशून जरांगेंचं मोठं विधान

अडीच वर्षांपूर्वी विवाह, पतीसह सासरच्यांकडून छळ; पोलिसाच्या पत्नीनं तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत संपवलं जीवन, दिरानं रुग्णालयात नेलं, पण...

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

Crop Loss: पिकेच झाली उद्‍ध्वस्त, खत देणार कशाला? नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ७० हजार टनांहून अधिक साठा पडून

Layoff 2025: अमेरिकन कंपनीचा धक्कादायक निर्णय; 4 मिनिटांच्या कॉलमध्येच भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं

SCROLL FOR NEXT