अहिल्यानगर

‘अगस्ती’त दिवाळीपूर्वीच ‘एफआरपी’

मधुकर पिचड यांच्या हस्ते गळीत हंगामास प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा

अकोले : अगस्तीमध्ये राजकारण आणले नाही म्हणूनच २८ वर्षे अगस्ती अविरत सुरू आहे. यापुढेही अगस्ती ऊर्जीतावस्थेत आणण्यासाठी सर्वपक्षीय मदत घेऊन यावर्षी मशनरीक्षमते इतके गाळप काढून नफ्यात वाढ करण्याचा प्रयत्न आहे. अगस्ती स्वयंपूर्ण करण्याचे धोरण आहे, असे उद्गार माजी मंत्री व अगस्ती संस्थापक अध्यक्ष मधुकर पिचड यांनी काढले.

२८ व्या ऊस गळीत हंगामाचा प्रारंभ संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री पिचड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे, योगी केशव बाबा चौधरी, कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर, माजी सभापती विठ्ठल चासकर, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भानुदास तिकांडे, जे. डी. आंबरे, विजयराव वाकचौरे, विकास शेटे, सीताराम देशमुख, गिरजाजी जाधव, सुधाकर देशमुख, रमेश देशमुख, आरिफ तांबोळी, प्रकाश नवले, भाऊसाहेब गोडसे, परबत नाईकवाडे, प्रदीप हासे, बाळासाहेब भोर उपस्थित होते.

या वेळी बोलताना पिचड म्हणाले की, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कारखाना सुरू आहे. योग्य ते नियोजन करून उसाला चांगला भाव देण्याचा आमचा मानस आहे. या वेळी सभासदांना २५ रूपये दराने दिवाळीला साखर देण्यात येणार आहे. कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करून कारखाना कर्जमुक्त करण्यात प्रधान्य राहील. कारखाना स्थापन करताना मी संकल्प केला होता की ह्या कारखान्यात कोणतेही पक्षीय राजकारण करणार नाही. सर्वांना बरोबर घेऊन हा कारखाना चालणार आहे. त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या विकास हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून २८वर्षे अगस्ती सुरू आहे. इथेनॉल प्रकल्प बायप्रॉडक्ट तयार करून अगस्ती आर्थिक घडी बसवली जाईल.

गायकर म्हणाले की, पहिले पेमेंट 2 हजार 250 रूपयांनी केले आहे. मात्र, एफआरपी रक्कम देणे आहे. दिवाळीपूर्वी सदर रक्कम दिली जाईल. साखरेचे दर वाढत असल्याने आशा आहे. तोटा कमी होण्यासाठी इथेनॉल प्रकल्प राबिवला आहे. यातून निश्चित तोटा कमी होईल. इथेनॉलमधून किमान १५ ते २० कोटी निव्वळ उत्पन्न मिळेल.

आमदार डॉ. किरण लहामटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे अगस्तीबाबत बैठक झाली आहे. त्यात गायकर यांनी भूमिका मांडली. अगस्ती काटकसरीने चालविणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT