MLA Sangram Jagtap  sakal
अहिल्यानगर

MLA Sangram Jagtap : सीना नदी, भिंगार नाल्यासाठी २० कोटी,आमदार जगताप यांचे प्रयत्न :खोलीकरण व रुंदीकरण होणार

MLA Sangram Jagtap : नगर शहरातील सीना नदी आणि भिंगार नाल्याच्या खोलीकरण व रुंदीकरणासाठी २० कोटी ६६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नांमुळे पूर व्यवस्थापनासाठी हा निधी प्राप्त झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : शहरातून जाणाऱ्या सीना नदी व भिंगार नाल्याच्या खोलीकरण व रुंदीकरणासाठी २० कोटी ६६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सीना नदीच्या पूररेषेची फेरआखणी व विकासासाठी आमदार आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.

राज्य शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगातून आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन योजनेअंतर्गत हा निधी मंजूर झाला आहे. तसे पत्र अहमदनगर महापालिकेला आज मिळाले आहे. नगर शहराच्या सीमेला लागून सीना नदी वाहते. नगर शहराभोवती तिची लांबी सुमारे १४ किलोमीटर आहे; परंतु सीना नदीच्या काठाने मानवी वस्त्या वाढत गेल्या. नदीकाठच्या जमीनधारकांनी अतिक्रमणही केले. नदीचे पात्र आकसत गेले. त्यातून नदीला एखाद्या ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले. पूर आला की नदीचे पाणी शहरात घुसते. मनपा प्रशासन, जिल्हाधिकारी यांच्याशी बैठका झाल्या.

सीना नदीपात्रातील अतिक्रमण व गाळामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी नागरी वसाहतींमध्ये शिरते. यंदाही पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. त्यामुळे नदी सुशोभीकरण व अतिक्रमण मुक्त करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला. सीना नदीतील गाळ व अतिक्रमणे काढल्यास पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरणार नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नगरमध्ये विविध कामे

कोरोना काळात नगर शहरातील विकास कामे काही प्रमाणात थांबली होती; परंतु त्यानंतर आमदार जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नगर शहरात विविध कामांसाठी भरीव निधी आणला.

या निधीतून वाडिया पार्क, शहरातील अंतर्गत रस्ते, उपनगरातील रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. उद्यानांसाठी सहा कोटींचा निधी मिळाल्यामुळे शहराच्या विकासात मोठी भर पडणार आहे, तसेच सीना नदी, भिंगारनाला सुशोभीकरणासाठी २० कोटींचा निधी मिळाल्याने नगर शहराचे रुपडे बदलणार आहे.

पूर नियंत्रण रेषेचा विषय मार्गी

नागपूर, बोल्हेगाव, सावेडी, बालिकाश्रम रोड, नालेगाव, ठाणगे मळा, काटवण खंडोबा रोड, स्टेशन भाग, पुणे महामार्ग, फुलसौंदर मळा, बाबर मळा या भागात पूर नियंत्रण रेषेचा विषय मार्गी लागत नव्हता; परंतु आमदार जगताप यांच्या प्रयत्नांनंतर सीना नदीलगत असलेल्या पूर नियंत्रण निळ्या व लाल रेषेचा विषय मार्गी लागला आहे. त्यामुळे जागामालकांना आता जागा विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टात घमासान! सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगाची पोलखोल; दिला थेट पुरावा; म्हणाले ''आयोग खोटं बोलतंय''

Pan Masala New Rules: पान मसाला खाणाऱ्यांसाठी मोठी बातमी! FSSAI चा कंपन्यांना दणका, नवे नियम लागू, जाणून घ्या काय बदललं?

Gold Price: सोन्यात १० हजारांची, तर चांदीत २० हजारांची उसळी; सुवर्ण बाजाराची तेजीकडे वाटचाल

Marathi News Live Updates : सुप्रीम कोर्टात सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद, निवडणूक आयोगाला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय?

Imran Khan Death Claim : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू ? पत्रकाराच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT